रायगडमध्ये कोरोनाबाधित आणखी सहा जण 
मुंबई

रायगडमध्ये कोरोनाबाधित आणखी सहा जण

सकाळ वृत्तसेवा

पनवेल : परिसरात राहणाऱ्या किराणा माल व रेशनिंग दुकानदाराला शुक्रवारी (ता. १७) कोरोनाची लागण झाली. कोरोनाबाधित ओला टॅक्‍सीचालकाच्या घरातील इतर दोन सदस्यांना कोरोनाचा संसर्ग असल्याचा अहवाल आल्याने पनवेलमध्ये एकाच दिवसांत पाच कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याची माहिती पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. 

शुक्रवारी वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे पनवेल पालिका हद्दीतील रुग्णांची संख्या आता ३१ वर जाऊन पोहचली असून, ग्रामीण पनवेलसह रायगड जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ३८ वर गेली आहे.

आयुक्त देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सापडलेल्या रुग्णांमध्ये तक्का परिसरातील रेशनिंग दुकानचालक तसेच ओला टॅक्‍सीचालकाच्या घरातील दोन सदस्य अशा तीन रुग्णांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत, तर काळुंद्रे परिसरात राहण्यास असलेल्या आणि भांडुप येथे औषध पुरवठा करण्यासाठी जाणे-येणे असलेल्या पुरवठादारासोबत कामोठे येथील एका रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 

श्रीवर्धनमध्ये आणखी एकाला संसर्ग 
श्रीवर्धन : येथे शुक्रवारी कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आली. हा कोरोनाबाधित रुग्ण 4 एप्रिलला श्रीवर्धन येथे आला असता, त्याला कोरोनांची प्राथमिक लक्षणे दिसण्यास सुरुवात झाली. उपचारासाठी त्याला श्रीवर्धन सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील चाचणीसाठी त्याला पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात वर्ग करण्यात आले. संबंधित व्यक्तीचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर तालुका प्रशासनाने संबंधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना कोरोना चाचणीसाठी पाठवल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणेंच्या कारला भीषण अपघात, भरधाव दुचाकीने दिली धडक, एक जखमी

राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील आरोपी सोनमची ११ महिन्यांनंतर सुटका! न्यायालयाने दिला जामीन, काय आहे नेमकं प्रकरण?

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाची हत्या, झोपेतच कुऱ्हाडीने वार करून तरुणाची हत्या

T20 World Cup : १८ वर्षीय खेळाडूची वर्ल्ड कप संघात निवड; कोण आहे Tilly Corteen-Coleman? टीम इंडिया...

Kolhapur Farmers Protest : 'दांडके पाठीत फोडू, वेळ पडली तर बलिदानही देऊ, पण वाडवडिलांची जमीन...; शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT