मुंबई

आधी तिला सॅनिटायझर पाजलं; नंतर टाॅयलेटमध्ये नेऊन केलं..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई :  मालाड पश्‍चिम येथील एका इंटरनॅशनल शाळेत पहिलीत शिकणारी सहावर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचारची घटना समोर आली आहे. घटनेनंतर पालकांनी शाळेबाहेर एकच गर्दी केली. यावेळी सर्व पालकांनी आरोपींना तात्काळ पकडण्याची मागणी शाळा प्रशासन व पोलिसांकडे केली. दरम्यान, याप्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 376 (बलात्कार) व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्‍सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

12 डिसेंबरला पीडित विद्यार्थीनी संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर गपचूप शांत बसली आणि थकलेली दिसल्यावर तिच्या आजीने ती का गप्प आहे? विचारले.  नंतर काही वेळेत चिमुकलीने आईला शाळेतील शौचालयात घडलेली घटना सांगितली. नंतर आई आणि आजीने तिला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांच्या सल्ल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल केले असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.

तीन दिवस आधी पीडितेला काही विध्यार्थ्यांनी सॅनिटायझर पाजले होते. त्यावेळी आई शाळेत तक्रार करण्यासाठी गेली असता तिला प्रवेशद्वारा वरून आत शिरू दिलं नव्हतं. तसेच शिक्षिकेला या बाबत माहिती झाल्यावर तिने गप्प राहण्याचा सल्ला दिला, असा आरोप पालक करतायत.  

रुग्णालयाने पोलिसांना त्याबाबत पत्र ही लिहिल्याचे मुलीच्या आजीने सांगितले. मग मालवणी पोलिसांना याबाबत माहिती दिल्याने पोलिसांनी भारतीय दंड संहिता 376 व पोक्‍सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला. मात्र ही बातमी पालकांना कळताच सकाळी शाळेच्या प्रवेशद्वारा जवळ गर्दी जमली आणि त्यांनी आरोपींना पकडण्यासाठी शाळा प्रशासन आणि पोलिसांकडे मागणी केली.

यावेळी झालेल्या गर्दीमुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता. याबाबतची माहिती मिळताच मालवणी, मालाड, बांगुर नगर आणि चारकोप पोलिस ठाण्याचे पोलिस आणि वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी पोहचले होते.

पोलिस उपायुक्त CCTV फूटेज ची पडताळणी करत आहेत. आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र मिळालेल्या माहितीच्या आधारावर दोन शाळेतील गणवेश परिधान केलेले इयत्ता सातवी आठवी चे विध्यार्थी यांना पीडितेच्या सोबत स्वच्छतागृहात जात असल्याचे सीसीटीव्हीमध्ये  दिसतंय. मात्र पोलिसांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

WebTitle : six year old girl forced to drink sanitizer in school and then see what happened

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Students Protest : MPSC विद्यार्थ्यांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये एल्गार, रस्त्यावर येत सरकारविरोधात केल्या घोषणाबाजी

Shocking News : पोपटाच्या मृत्यूने दु:खात बुडाला मालक, मृत पक्षी घेऊन थेट कलेक्टरकडे पोहोचला अन् केली 'ही' मागणी, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : पुण्यात भाजपचा पहिला उमेदवार बिनविरोध

Sangli Election : प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात मतदारांच्या ‘पायावर डोके’; सांगलीत निवडणूक प्रचाराला भावनिक वळण

Pune Municipal Election : पुण्यात भाजपचा पहिला नगरसेवक; मनिषा नागपुरे यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT