child sarvesh dhodi sakal media
मुंबई

मोखाडा : लसीकरणानंतर बालकाचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांत तक्रार

सकाळ वृत्तसेवा

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील (Mokhada) कोशिमशेत गावातील एका 16 महिन्यांच्या मुलाला एमआर व ट्रिपल पोलिओ बूस्टर डोस (polio booster vaccine) दिल्यानंतर त्याचा मृत्यू (child death) झाल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. मृत्यू पावलेल्या बालकाचे सर्वेश अशोक धोडी ( 16 ) असे नाव असून, आपल्या बालकाच्या मृत्यूची चौकशी करण्याबाबतची तक्रार पालकांनी मोखाडा पोलीस ठाण्यात (Mokhada police station) केली आहे. 

सविस्तर वृत्त असं की, मोखाड्यातील कोशिमशेत येथे 10  फेब्रुवारीला  वाशाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिकांनी, घरी येऊन एम आर व ट्रिपल पोलिओ बूस्टरचा डोस सर्वेश धोडी  (16)  या बालकाला दिला होता. सर्वेशला 9 तारखेला 16 महिने पूर्ण झाले असल्याने, उशिराने डोस द्या असे सर्वेशची आई मंगला धोडी हीने परिचारीकेला सांगितले. परंतु त्यांनी ऐकले नाही, असा आरोपा मंगला धोडी यांनी केला आहे.

हा डोस दिल्यानंतर काही वेळातच सर्वेशला ताप आला, डोस दिल्याने ताप आला असावा असे वाटल्याने, मंगलाने परिचारिकेने दिलेले औषध सर्वेश ला दिले. मात्र, सर्वेश चा ताप कमी होत नसल्याने व तब्ब्येत खालावल्याने 12 तारखेला खोडाळा येथील खाजगी दवाखान्यात त्याला ऊपचारासाठी आणण्यात आले होते. अंगात ताप खूप असल्याने सर्वेश ला आकडी येऊ लागल्या. अखेर, खाजगी दवाखान्यात त्याच्यावर उपचार करण्यात आले नाही, असाही आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. खासगी डॉक्टरांनी त्याला मोखाड्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिल्यानंतर त्यांनी लगेच मोखाड्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. 

दरम्यान, उपचारा आगोदरच सर्वेश चा  15  फेब्रुवारी ला मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, अशी माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे. या घटने विषयी सर्वेशच्या कुटुंबियांनी मोखाडा पोलीस ठाण्यात, बालकाच्या मृत्यू ची चौकशी ची मागणी करत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, मोखाडा पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद  ( ADR ) करून घटनेचा अधिक तपास सुरु केला आहे.

मृत बालकाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, अवशेष जे जे रूग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर सत्यता समोर येणार आहे. त्यामुळे अहवालाची वाट पहावी लागणार आहे. 

- डाॅ. भाऊसाहेब चत्तर, तालुका वैद्यकीय अधिकारी, मोखाडा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT