mumbai-covid.jpg 
मुंबई

आठवडाभरात मुंबईत कोरोनामुळे ६९ मृत्यू

सकाळवृत्तसेवा

मुंबई - राज्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील आठवडाभराची मृत्यूची आकडेवारी पाहिल्यास राज्यात एकूण ७७३ मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. म्हणजे दिवसाला सरासरी ७० मृत्यू झाले आहेत. तर मुंबईत ही मागील आठवडाभरात ६९ मृत्यू झाले असून दिवसाला सात मृत्यूंची नोंद झाली आहे. दरम्यान ,रुग्णसंख्या वाढत असून मृत्यू ही वाढणार असा इशारा कोरोना राज्य टास्क फोर्स समितीतील तज्ज्ञ देत आहेत. मात्र, मास्क पासून कोरोना चाचण्यांपर्यंत सर्वसामान्यांनी महामारीला हलक्यात घेतल्याने असा परिणाम दिसत असल्याचे ही मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

'आता काही होईल ते होऊ दे, ठराविक काळात चाचणी का करायची, मास्क नाकातोंडाच्या खाली हनुवटीवर वापरणे, आणि औट घटकेला रुग्णालयात दाखल होणे अशी कारणे रुग्णांना मृत्यूकडे नेत असल्याचे निरीक्षण मांडण्यात येत आहे. दरम्यान, मागील आठवडाभराचा अभ्यास केल्यास राज्यात आठवड्याभरात 773 मृत्यू झाले आहेत.

म्हणजे दिवसाला 100 मृत्यू नोंदवण्यात आले. तसेच मुंबईत आठवड्यात 69 मृत्यू आहेत. सप्टेंबर मध्ये ही एवढा उच्चांकी अंक नव्हता. मृत्यू दर नियंत्रणात आहे, मात्र रुग्णांची संख्या वाढत गेल्यास मृत्यू देखील वाढत जातात. याचा परिणाम 14 दिवसांनी पाहायला मिळतो, असे राज्य कोरोना टास्क फोर्स सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

आठवडाभरातील मृत्यू : 
राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात शनिवारी 166 करोना मृत्यू, शुक्रवारी राज्यात 112, गुरुवारी 111, बुधवारी 95 मंगळवारी 132, सोमवारी 58 तर  मागील रविवारी 99 असे एकूण 773 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. तर एकट्या मुंबईत रविवारी 10, सोमवारी 10, मंगळवारी 8, बुधवारी 6, गुरुवारी 13, शुक्रवारी 10, शनिवारी 13 असे एकूण 69 मृत्यू आहेत. 

(संपादन - दीनानाथ परब)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT