Imitation Jewellery 
मुंबई

इमिटेशन ज्वेलरीत 'व्होकल फॉर लोकल'चा नारा, पण...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोना महामारीमुळे चीनी इमिटेशन ज्वेलरीच्या विरोधात लोकभावना तीव्र होत आहे. त्याचवेळी वोकल फॉर लोकल मोहीमेस चालना देण्यासाठीही चीनी उत्पादकांना विरोध होत आहे. स्थानिकांना चालना देण्यासाठी चीनी इमिटेश ज्वेलरीवरील आयात कर वाढवण्याची मागणी होत आहे. भारतात इमिटेशन ज्वेलर्सचे मार्केट 35 हजार कोटींचे आहे. त्यात चीनमधून येणाऱ्या ज्वेलरीचा वाटा 40 टक्के वाटा आहे. हे कमी केल्यास त्याचा भारतातील उत्पादकांना फायदा होईल, याकडे इमिटेशन ज्वेलरी उत्पादक संघटना लक्ष वेधत आहे. इमिटेशन ज्वेलरीची निर्मिती करणाऱ्यांनी विक्रेत्यांची भेट घेऊन चीनी ज्वेलरीची विक्री कमी करण्यासाठी विनंती केली आहे.

चीनमधून येणारी इमिटेशन ज्वेलरी जास्त प्रमाणात येते, पण त्याच्यावरील आयात कर कमी करण्यासाठी खरेदीचे मूल्य कमी दाखवले जाते, असा दावा निर्मात्यांच्या संघटनेने केला. त्याची किंमत योग्य दाखवल्यास भारतातील आणि चीनमधील इमिटेशन ज्वेलरीच्या किंमतीत फारसा फरक राहणार नाही असाही दावा होत आहे.

विक्रेते भारतीय उत्पादकांना जास्त पसंती देण्यास तयार आहेत. मात्र इमिटेशन ज्वेलरीपैकी 50 टक्के चीनमधून येते. कागी दागिन्यातील 90 टक्के चीनमधून येतात, असे सांगितले त्याचवेळी चीनमधून निर्यात होत असलेल्या इमिटेशन ज्वेलरी केवळ दोन टक्के भारतात येत असल्याचा दावा करण्यात आला. मात्र इमिटेशन ज्वेलरीची निर्मीती करणाऱ्या कंपन्यांना हे पूर्ण मान्य नाही. त्यांनी त्या दागिन्यांवर एमआरपीचा उल्लेख नसतो याकडे लक्ष वेधले. त्याचबरोबर भारतातून मागणी वाढली तर इमिटेशन ज्वेलरीच्या भारतात तयार होणाऱ्या दागिन्यांच्या किंमतीत घट येऊ शकेल. तसेच काही वर्षापू्र्वी भारतात हे दागिने तयारही होत नव्हते, पण आता परिस्थिती बदलली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

the slogan of Vocal for Local in imitation jewelery, but

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation Election 2025 : अखेर मनपा निवडणुका जाहीर, मतदान अन् निकालाची तारीख काय? कसा असेल निवडणूक कार्यक्रम? वाचा....

BMC Election: सत्ता, संघर्ष आणि संधी... बीएमसीच्या गेल्या ५ निवडणुकांचे निकाल काय होते? जाणून घ्या मुंबई महापालिकेचा राजकीय प्रवास...

Latest Marathi News Live Update : महानगरपालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार

IPL 2026 Auction : उद्या लिलाव अन् पठ्ठ्याने आज ठोकले खणखणीत शतक... कुटल्या १५ चेंडूंत ७२ धावा; RCB च्या माजी खेळाडूची धमाल

हॉलिवूड हादरलं ! हॅरी मेट सॅली फेम प्रसिद्ध दिग्दर्शक आणि त्याच्या पत्नीची राहत्या घरी निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT