ठाणे शहरातील ‘हरित सायकल’ प्रकल्पांतर्गत उभारलेले सायकल स्टँड.
ठाणे शहरातील ‘हरित सायकल’ प्रकल्पांतर्गत उभारलेले सायकल स्टँड.  
मुंबई

ठाण्यातील ‘मंद’ सायकल नवी मुंबईत सुसाट! 

सुजित गायकवाड

ठाणे/नवी मुंबई : सार्वजनिक वाहतूक यंत्रणेच्या मर्यादा, रिक्षाचालकांची मुजोरी आणि वाहतूक कोंडीची समस्या यांवर तोडगा म्हणून सुरू करण्यात आलेल्या ‘हरित सायकल’ प्रकल्पास ठाणेकरांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत असले, तरी नवी मुंबईसारख्या नियोजनबद्ध शहराने मात्र सायकल आणि ई-बाईक सेवेचा मोठ्या प्रमाणावर लाभ उठवल्याचे चित्र आहे. शहरातील नागरिकांच्या गरजा आणि त्यानुसार आखलेले सायकल थांबे यामुळे नवी मुंबईकरांचा या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळत असून, नेमक्‍या याच गोष्टींच्या अभावामुळे ठाण्यात मात्र सायकल प्रवास मंदगतीने सुरू असल्याचे सांगण्यात येते. 

ठाण्यात हरित सायकलचे ५० थांबे जाहीर करण्यात आले होते; मात्र व्हिवियाना मॉल, कोरम मॉल, रेमंड कंपनी, माजिवडा, पोखरण रस्ता, वंदना टॉकीज आदी २५ सायकल थांब्यांचेच काम पूर्ण झाले आहे. शहरात मोक्‍याच्या ठिकाणी हे थांबे नसल्याने, तसेच शहरात कोठेही सायकल ट्रॅक नसल्याने अजूनही केवळ व्यायाम या हेतूनेच ठाणेकर या सायकलचा वापर करताना दिसतात. त्यासाठीच्या मोबाईल ॲपवर आतापर्यंत केवळ दीड हजार नागरिकांनीच नोंदणी केल्याचे सांगण्यात आले. 

नवी मुंबईत मात्र सायकल आणि ई-बाईक या दोन्ही सेवांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. आजवर येथे दोन लाख दोन हजार ५८० जणांनी सायकलचा; तर नऊ हजार ८०० जणांनी ई-बाईकचा वापर केला आहे. यातील बहुसंख्य नागरिक घर ते रेल्वेस्थानक अशा प्रवासासाठी रिक्षाऐवजी सायकलचा पर्याय निवडत असल्याचे दिसून आले आहे. 

रेल्वेस्थानक परिसरात थांबे नसल्याने स्टेशन गाठण्यासाठी आजही टीएमटी, रिक्षा यांचाच विचार करावा लागतो. सकाळच्या वेळेस केवळ व्यायाम म्हणून मी सायकल चालवतो. 
- राजीव ढाके, ठाणे 

सायकल थांबे शहरापासून लांबच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. ज्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते, त्यांच्या आसपास जवळच्या ठिकाणी हे थांबे असणे गरजेचे आहे. 
- सदानंद जाधव, ठाणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT