Slum sakal media
मुंबई

मुंबई विद्यापीठातील झोपड्या दोन महिन्यात हटवल्या जाणार

कुलसचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai university) कलिना संकुलातील (Kalina Sankul) १४ वर्षांपासून विविध ठिकाणी वसलेल्या झोपड्या (slum) दोन महिन्यांत हटवल्या जातील, अशी माहिती कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर (Suhas Pednekar) यांनी आज सिनेटमध्ये दिली. झोपड्या हटवण्यासाठी कुलसचिव प्रा. सुधीर पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन (committee formed) केली जाणार असून त्यात विद्यापीठाचे अभियंता आदी सदस्य असतील, अशी माहितीही कुलगुरूंनी दिली.

सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाच्या मागे १४ वर्षांपासून वसलेल्या झोपड्यांचा विषय सिनेटमध्ये उपस्थित केला होता. विद्यापीठातील विविध कामांसाठी कंत्राटदारांनी इथे कामगारांना आणले होते. त्यांपैकी इथे राहणाऱ्या अनेक नागरिकांची मुले जन्माला आली. ती आता रहिवासी होण्याच्या मार्गावर असून त्यांच्या जन्मदाखल्यावर इथले पत्ते आहेत. त्यामुळे एक दिवस कालिना संकुल झोपड्यांमुळे ‘एसआरए कालिना सोसायटी’ होईल, अशी भीती व्यक्त करीत थोरात यांनी त्यावर कारवाई कधी करणार, असा सवाल केला होता.

आम्ही वेळोवेळी विद्यापीठात झालेल्या झोपड्यांच्या अतिक्रमणाचा विषय लक्षात आणून देतो; मात्र त्यावर कारवाई केली जात नाही. हे गंभीर आहे, असा मुद्दा सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी मांडला. त्यावर कंत्राटदारांचे काम पूर्ण झाल्यावर या झोपड्या लवकरात लवकर हटवल्या जातील, असे आश्वासन कुलसचिव सुधीर पुराणिक यांनी दिले. मात्र, त्यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे सिनेट सदस्य वैभव नरवडे आदींनीही या झोपडपट्टीवर कारवाई कधी करणार, अशी मागणी लावून धरली. विद्यापीठातील कामकाजासाठी येणाऱ्या कामगारांना राहण्याची मुभा यापुढे दिली जाऊ नये. त्यासाठी त्यांच्याकडून लेखी घ्यावे, अशा सूचनाही कुलगुरूंनी दिल्या.

कुलसचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

कुलगुरूंनी विद्यापीठाच्या कालिना संकुलात असलेल्या झोपड्या पुढील दोन महिन्यांत हटवल्या जातील, असे आश्वासन दिले. त्यासाठी कुलसचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल. त्यासाठी सिनेट सदस्य वैभव थोरात, वैभव नरवाडे आदींनी मदत करावी, असे आवाहनही केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT