मुंबई

कल्याण पूर्व आणि पश्चिम चा काही भाग अंधारात; पर्यायी फीडर मार्फत वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण विभागाची धडपड सुरू 

रविंद्र खरात

कल्याण  - ग्रीड फेल्युअरमुळे कल्याण पूर्व पश्चिमेच्या काही भागात विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकानां चांगलाच त्रास झाला असून पर्यायी फीडर मार्फत वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण विभागाची धडपड सुरू आहे .

मंगळवार ता 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 च्या सुमारास ग्रीड फेल्युअरमुळे विद्युत पुरवठाखंडित झाला आहे .एकीकडे लॉक डाऊन असल्याने अनेक नागरिक आज ही घरून काम करत आहेत तर अनेक जण घरीच असल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्याने चांगलेच हाल झाले आहेत .दरम्यान टाटा पॉवरकडून वीजपुरवठा होणारे केबी-1 व केबी-2 हे दोन फिडर बंद आहेत. केबी-2 फिडरवरून कल्याण पश्चिमेला वीजपुरवठा होतो. कल्याण पश्चिमेतील वायलेनगर, पारनाका, दुर्गाडी, गांधारी रोड, आधारवाडी परिसरातील जवळपास 50 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला आहे. तर केबी-1 फिडरवरून वीजपुरवठा होणाऱ्या कल्याण पूर्वेतील 90 फूट रोड, टाटा नेतीवली परिसरातील सुमारे 10 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला आहे. या फिडरवरील वीज ग्राहकांना पर्यायी फिडरमार्फत वीजपुरवठा सुरू करण्यात येत आहे. आतापर्यंत 16 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आला आहे. वरील फिडर वगळता इतर सर्व ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत असल्याचा दावा महावितरण ने केला असून नागरिकांना फिडरमार्फत वीजपुरवठा सुरू करण्याचा प्रयन्त सुरू असल्याची माहिती महावितरण ने दिली .

ग्रीड फेल्युअरमुळे कल्याण शहराला टाटा पॉवरकडून वीजपुरवठा होणारे केबी-1 व केबी-2 हे दोन फिडर सकाळी 10 वाजून 5 ते 7 मिनिटापासून बंद आहेत. केबी-2 फिडरवरून कल्याण पश्चिमेला वीजपुरवठा होतो. कल्याण पश्चिमेतील वायलेनगर, पारनाका, दुर्गाडी, गांधारी रोड, आधारवाडी परिसरातील जवळपास 50 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला आहे. तर केबी-1 फिडरवरून वीजपुरवठा होणाऱ्या कल्याण पूर्वेतील 90 फूट रोड, टाटा नेतीवली परिसरातील सुमारे 10 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला आहे. या फिडरवरील वीज ग्राहकांना पर्यायी फिडरमार्फत वीजपुरवठा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. आतापर्यंत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजेच 35 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आला आहे. वरील फिडर वगळता इतर सर्व ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत आहे.

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : थंडा थंडा कूल कूल, विद्यार्थ्यांसाठी शाळेने बनवला वर्गातच स्विमिंग पूल

SCROLL FOR NEXT