मुंबई

हृदयद्रावक ! ...आणि मुलांनी वाटेतच आपल्या बापाला गमावलं, वाचा मन सुन्न करणारी बातमी

सकाळवृत्तसेवा

रायगड - कोरोना व्हायरसमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वच व्यवहार ठप्प झाले. यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली. तसंच कामचं ठप्प असल्यानं या मजुरांनी आपल्या गावची वाट धरली. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात अडकलेल्या मजुरांना आपआपल्या गावी पोहोचण्यासाठी सरकारनं विशेष ट्रेन आणि एसटी बसचं आयोजन केलं आहे. पण अशातच रायगडमध्ये एक मन हेलावणारी घटना घडली आहे. मुंबईहून निघालेल्या एका चाकरमान्याचा वाटेतच मृत्यू झाल्याची वाईट बातमी समोर आली आहे. 

हा चाकरमानी मुंबईहून चालत आपल्या गावी जात होता. मुंबई-गोवा महामार्गावरील रात्री ही दुर्दैवी घटना घडली. मोतीराम जाधव असं मृत व्यक्तीचं नाव आहे. मोतीराम हे आपल्या कुटुंबासह मुंबईतल्या कांदिवलीमधून श्रीवर्धन येथे आपल्या गावी जाण्यासाठी चालत निघाले होते. यादरम्यान पेण तालुक्यातल्या जिते गावाजवळ त्यांना मृत्यूनं गाठलं. 

वडिलांचं छत्र हरपलं 

मुंबईत कामधंदा ठप्प झाल्यानं गावच्या घराच्या ओढीनं मोतीराम हे आपल्या चिमुकल्यांना घेऊन रस्त्यानं निघाले होते. याच दरम्यान वडिलांचा मृत्यू पाहण्याची दुर्देवी वेळ ही या चिमुकल्यांवर आली आहे. रायगडमध्ये अशी ही तिसरी घटना घडली आहे. 

अनेक कामगार, मजूर आपआपल्या गावी जात आहेत. सरकारनं विशेष ट्रेन, बसची सुविधा केली आहे. दरम्यान चाकरमान्यांनाही त्याच्या गावी पाठवण्यासाठी सरकारनं परिपत्रक काढून त्यांना विशेष रेल्वेनं त्वरित पाठवावं, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माजी आमदार माणिक जगताप यांनी केली आहे. 

राज्यभरात अनेक मजूर, कामगार, विद्यार्थी, पर्यटक राज्यभरातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकले. या अडकलेल्या नागरिकांसाठी एसटी महामंडळाकडून मोफत बस सेवा सुरु करण्यात आली आहे.

sons lost their father on their way back to home read emotional story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

SCROLL FOR NEXT