राज्यात लवकरच कला विद्यापीठ; वाचा कोणतं आहे ते... 
मुंबई

राज्यात लवकरच कला विद्यापीठ; वाचा कोणतं आहे ते...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आशिया खंडातील पहिले कला महाविद्यालय असलेले मुंबईतील जे. जे. स्कूल  ऑफ आर्ट लवकरच अभिमत कला विद्यापीठामध्ये (डीम्ड युनिव्हर्सिटी) रूपांतर होणार आहे. या दर्जासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) प्रस्ताव पाठवला आहे. यूजीसीच्या मागणीनुसार जे. जे. स्कूल ऑफ आर्ट विशेष दर्जा मिळविण्यासाठी अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रियाही लवकरच पूर्ण करणार आहे.

कला क्षेत्रातील नामांकित संस्था असलेली जे. जे. स्कूल ऑफ आर्ट लवकरच कात टाकणार आहे. राज्य सरकारने संस्थेला स्वायत्ततेचा दर्जा बहाल केल्यानंतर आता संस्थेने आपल्या कक्षा रुंदावण्यास सुरुवात केली आहे. संस्थेच्या विकासासाठी गेल्या सरकारने अर्थसंकल्पात १५० कोटींची तरतूद केली आहे. सरकारकडून कलेला राजाश्रय मिळू लागल्याने संस्थेने अभिमत विद्यापीठ होण्यासाठी पाऊल पुढे टाकले आहे. यासाठी राज्य सरकारच्या मदतीने गेल्या वर्षी अखेरीस यूजीसीकडे जे. जे. कला महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे, परंतु यूजीसीने देशातील नामांकित संस्थेला विशेष दर्जा देण्याकडे दुर्लक्ष केले आहे.

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट आणि जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर अशा तीन महाविद्यालयांचे मिळून अभिमत कला विद्यापीठ बनावे यासाठी कला संचालनालयाने कंबर कसली आहे. यूजीसीकडे संचालनालयाने सादर केलेला ऑफलाईन प्रस्ताव रखडला आहे. त्यातच ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्ज करण्याच्या सूचना यूजीसीने केली आहे; मात्र सुमारे सहा महिन्यांपासून यूजीसीचे ऑनलाईन अर्ज करण्याचे संकेतस्थळ खुले झाले नव्हते. परंतु दोन दिवसांपूर्वी संकेतस्थळ सुरू झाल्याच्या सूचना यूजीसीकडून मिळाल्याने संचालनालयाने ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रियाही तातडीने पूर्ण करण्याचे ठरवले आहे.

जे. जे. स्कूल ऑफ आर्टला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासाठी राज्य सरकारही आवश्‍यक ती मदत करत आहे. अभिमत विद्यापीठाला मान्यता मिळाल्यास राज्यभरात कला महाविद्यालयाचा विस्तार होण्यास मदत होईल.
- राजीव मिश्रा, संचालक, कला संचालनालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praneet More Show Controversy: केईएम रुग्णालयाची मोठी कारवाई! आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी सेजल पवारला दिली शिक्षा; पण कोणती?

इंधन क्रांती की मोठा झटका? E20–E85 इथेनॉलमुळे पेट्रोलचे दर आणि मायलेजवर काय परिणाम होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित आणि सरकारचा प्लॅन

Numerology : 'या' मुलांकाचे लोक असतात कुटुंबात सर्वांत गुणी; कधीच कुणाला दुखवत नाहीत, आई-वडिलांचा कधीच करत नाहीत अपेक्षाभंग

Aakanksha Walunj : दुष्काळी गावातील सर्वसामान्य कुटुंबातील आकांक्षा वाळुंज हिची वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी झेप; एमबीबीएस पदवी संपादन करून बनली डॉक्टर

चहात बुडवलेली इडली पाहून शशी थरूरही भडकले; viral पोस्टवर भन्नाट प्रतिक्रिया देत म्हणाले...

SCROLL FOR NEXT