Luxurious-Cars 
मुंबई

मुंबई: लवकरच मोबाईलवरुन बुक करता येणार कार पार्किंगची जागा

कसं करणार नियोजन?

समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मोबाईलवरुन मुंबईत गाडीच्या पार्किंगसाठी जागा (car parking place) अडवून ठेवता येणार आहे. पण,यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. महानगर पालिकेने (BMC) वाहानतळांच्या नियोजनासाठी तज्ञांची समिती नियुक्त केली असून या समितीचा अभ्यासच 2024 पर्यंत चालणार आहे. त्यानंतर हे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. (Soon you can book car parking place from mobile in mumbai)

वाहानतळांच्या नियोजनासाठी महानगर पालिका वाहनतळ प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी प्रत्येक विभागानुसार वाहानतळांची जागा निश्‍चित करणे स्थानिक गरजेनुसार वाहानतळांचे नियोजन करणे,जीआयएस मॅपिंग करणे अशी कामे करण्यासाठी टाटा समाजविज्ञान संस्थेसह वाहतुक क्षेत्रातील तज्ञ आणि महानगर पालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे.

ही समिती वाहनतळ प्राधिकरणाची रुपरेषा बनविण्या बरोबरच मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी माहिती पुरविण्याची जबाबदारी या समितीवर आहे. या समितीला कामकाज पूर्ण करण्याची मुदत एप्रिल 2024 पर्यंत आहे. त्यामुळे आता तीन वर्षानंतरच मोबाईलवरुन पार्किंगची जागा अडवून ठेवण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तसेच,या ॲप्लिकेशनच्या माध्यमातूनच पार्किचे शुल्कही भरण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्याची सोय करुन देण्याचा विचार महानगर पालिका करत आहे.

टाटा समाजविज्ञान संस्थेचे वाहतुक क्षेत्रातील तज्ञ, नगररचनाकार, वाहतुक तज्ञ अशोक दातार,शिरीष जोशी यांच्यासह पालिकेचे निवृत्त अधिकारी निता निफाडे,प्रशांत मोरजकर या समितीत आहे.या समितीच्या शुल्कावर महानगर पालिका 4 कोटी 70 लाख रुपये खर्च करणार आहे.

ही समिती काय करणार

-विभागानुसार वाहानतळांसाठी आराखडा तयार करणार. यात कोणत्या विभागात कोणत्या प्रकारची वाहाने जास्त आहे. म्हणजे अवजड वाहाने जास्त असलेल्या विभागात तशी वाहानतळांची सोय करण्यात येईल.

- वाहानतळांसाठी जागा निश्‍चित करणार विभागानुसार आराखडा तयार झाल्यावर ही समिती गरजेच्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पध्दतीने वाहानतळांची जागा निश्‍चित करणार.

-जीआय, स मॅपिंग - प्रस्तावित वाहानतळांचे जीआयएस मॅपिंग करण्यात येणार आहे. त्याचा वापर मोबाईल ॲप्लिकेशन बनविण्यासाठी होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात, १५०० की ३०००? असं करा चेक

Ashutosh Ranka Detained : कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका यांच्यासह अनेकांना आसाममध्ये घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

Central Railway: दिवाळी, छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या ४१८ गाड्या, आरक्षण सुरू; 'अशी' करा सीट बुक

IND vs WI, 1st ODI: नमन धीरचे भारतासाठी पदार्पण! जडेजाचे कमबॅक, पण सिराजला जागा नाही; कशी आहे Playing XI

SCROLL FOR NEXT