बंकर sakal
मुंबई

बंकरमध्ये ऐकू येतायेत कानठळ्या बसवणारे आवाज, भारतीय विद्यार्थ्यांची आपबीती

युक्रेनमध्ये फसलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची आपबीती

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

मुंबई: रशिया युध्द पुकारेल असं युक्रेनच्या नागरिकानाही वाटतं नव्हत. कॉलेज रेग्युलर सुरु होते. मात्र परिस्थिती अचानक बदलली, युक्रेन सोडण्याचा इशारा भारतीय दूतावासाकडून मिळाला, 24 फेब्रुवारीला आमचे विमान होते, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. ओडेसाचे विमानतळ लष्कराने ताब्यात घेतलं. 40 किलोच्या बॅगा अंगावर घेऊन तिथून माघारी परतावे लागले,आता शहरातील परिस्थिती पुर्ण बदललेली आहे.शहरातील रस्ते लष्कराने व्यापले आहेत, एटीएमवर रांगा लागल्या आहेत, शहरात सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे.

आम्ही अनोळखी भागात फसलो आहे. युक्रेनचे तिसरे मोठे शहर असलेल्या ओडेसात, अडकलेला भारतीय विद्यार्थी यश मोटवाणी ‘सकाळ’ला आपली आपबीती सांगत होता.तो वर्ध्यातील हिंगणघाटचा राहीवासी आहे. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले यशसारखे हजारो भारतीय विद्यार्थी राजधानी किव्हसह वेगवेगळ्या शहरात अडकले आहेत.हे युध्द लवकर संपणार नाही, रशिया भारताचा मित्र असला तरी दोन देशांच्या धुमशक्रीत आपला जीव जायला नको अशी चिंता या विद्यार्थ्यांना सतावले आहे.

खारकिव्ह युक्रेनचे दुसरं मोठं शहर,रशियापासून केवळ 40 किलोमीटर अंतरावर..ऱशियाने या शहरावर पहिला हल्ला केला. पुण्यातील शिरुरमधील सुशांत शितोळे हा कॅराझीना या विद्यापीठात एमबीबीएसच्या पहिल्या वर्गात शिकतोय. सुशांत गुरुवारी सकाळी उठला तो सायरन आणि मिसाईल, बॉम्बहल्याच्या आवाजाने.

शहरात रशियन फौजा घुसल्या, घनघोर युध्दाला सुरुवात झाली. शासकीय हॉस्टेलमध्ये तळमजल्यावर तयार केलेल्या बंकरमध्ये सुशांतसह आजूबाजूच्या होस्टेलमधील 4 हजार भारतीय विद्यार्थ्यांना बंकरमध्ये हलवण्यात आलंय. रशियन फौजांचे आक्रमण एवढे भिषण आहे की अंडरग्राऊंड बंकरमध्ये बॉम्बहल्याचे कानठळ्या फोडणारे आवाज ऐकायला येत असल्याचे सुशांतने सकाळशी बोलताना सांगीतले.

छत्तीसगडच्या बिलासपूरची रिया लदेर दोन दिवसापासून खारकिव्हच्या मेट्रो स्टेशनच्या बंकरमध्ये राहत आहे.शहरात अफरातफरी माजली आहे, सर्वत्र फायरींग, आकाशात रशियाचे विमान बॉम्बवर्षाव करत आहे. बंकरमध्ये खायला अन्न नाही.रिया ड्राय फूटवर दिवस काढत आहे. बाहेर हिमवर्षावर सुरु आहे. मोबाईलची चार्जींग संपत चालली आहे. भारतीय दूतावासापासून संपर्क पुर्णपणे तुटला आहे.रशिया आपला मित्र असला तरी फायरींग सुरु झाल्यावर त्यांना काय माहिती असणार आहे, असा सवाल रियाने ‘सकाळ’शी बोलताना केला.

युक्रेनची राजधानी किव्ह इथे घनघोर युध्दाला तोंड फुटलंय, गुरुवारी सुरु झालेल्या रशियाचे आक्रमण शुक्रवारी किव्ह शहराच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले. छत्तीसगढचा दानिश कुरेशी, किव्हमध्ये युक्रेनच्या वैद्यकीय विद्यापीठात शेवटच्या वर्षाला शिकतो. फायनल येईल. तो शासकीय बंकरमध्ये सुरक्षित आहे.बाहेर पडायला प्रशासनाने मनाई केली आहे.त्याचा संपर्क तुटला आहे.शहर सायरन, क्षेपणास्त्र आणि विमानभेदी तोफाने दुमदुमत आहे. दुपारनंतर दानिशचा संपर्क तुटला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT