मुंबई

द. कोरियातील विद्यार्थी सांगताहेत स्वच्छतेचे महत्त्व...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दक्षिण कोरियातील ‘एएसईझेड’ संस्थेने मुंबई महापालिकेच्या सहकार्याने रविवारी सकाळी महालक्ष्मीतील धोबीघाटावर स्वच्छता मोहीम राबवली. ‘क्राईम फ्री स्ट्रीट’आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश कोरियातील विद्यार्थ्यांनी दिला आणि मुंबईकरांना स्वच्छतेबाबत एक वस्तुपाठच घालून दिला. मुंबई स्वच्छ होण्यासाठी आपला परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी घ्या, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.

हे वाचलं का : बालगृहातील मुलांना स्टीव वाॅ शिकवतोय क्रिकेट!

दक्षिण कोरियातील विद्यार्थ्यांसमवेत खासदार अरविंद सावंत आणि महापौर पेडणेकर यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. दक्षिण कोरियातील संस्थेचे भारतातील प्रमुख पीटर किम, आमदार सुनील शिंदे, धोबीघाटमधील संस्थेचे संतोष कनोजिया, विनिता चव्हाण आदींनी ‘स्वच्छ मुंबई... सुंदर मुंबई’चा संकल्प केल्यानंतर आपल्या विभागातून स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली.

हेही वाचा : लग्नापूर्वीचं छायाचित्रण करायचंय! नवी मुंबईतील ही ठिकाणं आहेत `बेस्ट`

आपण ज्या ठिकाणी व्यवसाय करतो आणि राहतो ती जागा व तो परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने घेतल्यास मुंबई स्वच्छ होण्यास मोठा हातभार लागेल, असे महापौर पेडणेकर म्हणाल्या. 

धोबीघाटचा परिसरही स्वच्छ करणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर लक्षात आले. स्वच्छता मोहिमेला येथून सुरुवात होत आहे याचा आनंद असून आता स्थानिकांची जबाबदारी वाढणार आहे. दक्षिण कोरियातील विद्यार्थी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले, हे मुंबईकरांसाठी प्रेरणादायी आहे, असेही महापौर म्हणाल्या.

वाचायलाच हवं : वरुण धवन म्हणतोय, `Mr. लेले, मजा लेले`

तब्बल २५० महाविद्यालयांचा सहभाग
स्वच्छता मोहिमेत मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, विरार, नालासोपारा आदी ठिकाणच्या महाविद्यालयांनी भाग घेतला. त्यांच्या तब्बल २५० विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : ड्रग्स तस्करी प्रकरणातील वाँटेड आरोपी विरेंदर बसोयाला पुण्यात आणणार

१५ ऑगस्टच्या तारखेला होता ज्योतिषांचा विरोध, मग नेहरूंनी काढला तोडगा.. वाचा नेमका किस्सा...

Nanded News : मेरिट योजनेत एसजीजीएस अभियांत्रिकी संस्थेची निवड; १८ कोटींचे आर्थिक सहाय्य

MBBS and BDS Admission : वैद्यकीय एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; अंतिम तारीख १५ ऑगस्ट

SCROLL FOR NEXT