metro rail sakal media
मुंबई

कुलाबा सीप्झ मेट्रोची चाचणी; मरोळ-मरोशी येथे भुयारी मार्गाच्या ठिकाणी

आरेतील एकाही वृक्षाला धक्का न लागू देता चाचण्या पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

सिद्धेश्वरडुकरे

मुंबई : दक्षिण मुंबईतील (south Mumbai) वाहतूक कोंडी (traffic jam) सोडविण्यासाठी महत्वाची मेट्रो (metro railway) मार्गिका कुलाबा ते सीप्झ साठीच्या मेट्रो रेल्वेची डब्यांची मरोळ मरोशी येथे करण्यात येणार आहे. आरेतील राज्य शासनाने (mva government) स्थगिती दिलेल्या त्या जागेच्या हद्दीबाहेरच ही चाचणी करण्यात येणार असून आरेतील एकाही वृक्षाला धक्का न लागू देता मेट्रोच्या चाचण्या पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) यांनी केली आहे. सध्या मरोळ मरोशी या रस्त्याच्या भुयारी मार्गाचे काम चालू असून या कामाच्या जवळच रॅम्प बनवून काम हाती घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या चाचणीच्या कामाकरिता कोणतेही झाड तोडण्यात येणार नाही.

मुंबई येथील वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी व प्रदूषण कमी करण्यासाठी कुलाबा ते सीप्झ या मार्गावर मेट्रो लाईन-३ चे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गिकेकरिता अल्स्टॉम या कंपनीने श्रीसिटी आंध्रप्रदेश येथे ८ डब्यांची ट्रेन तयार केलेली आहे. या गाडीची त्या ठिकाणी तांत्रिक चाचणी झालेली आहे. आता प्रत्यक्षात याची चाचणी मुंबई येथे १० हजार किमी चालवून घेण्यात येणार आहे. त्यानंतर कुलाबा ते सीप्झ या मार्गिकेवर देखील ट्रेन चालविण्यात येणार आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर अशा पध्दतीच्या ३१ ट्रेन या मार्गावर धावण्याकरिता उपलब्ध होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG सिलिंडरच्या मुद्यावर सरकारने केले हात वर? नागरिकांना विकल्प शोधण्याचे आवाहन, नेमकं काय सांगितलं?

Iran War : अमेरिका-इराण युद्धामुळे इंग्लंडचे क्रिकेट खेळायचे झालेत वांदे! Dukes Ball चा तुटवडा अन् गगनाला भिडल्या किमती...

World Sparrow Day : ‘या चिमण्यांनो परत फिरा रे…’ शहरातून हरवलेली चिऊताई पुन्हा कशी येईल?

राज्य सहकारी बँकेची ‘थकबाकी निवारण योजना २०२६’ जाहीर; हजारो कोटींच्या कर्ज निपटाऱ्याला गती

Latest Marathi News Live Update : लोणावळा नगरपरिषदेत तणाव; नगराध्यक्षांनी मुख्य अधिकाऱ्यांच्या कॅबिनला ठोकले टाळे...

SCROLL FOR NEXT