मुंबई

अंध प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुकर, जागा ओळखण्यासाठी विशिष्ट बिप

कुलदिप घायवट

मुंबई:  उपनगरी रेल्वेसेवेचा लाभ सर्वसामान्यांना घेण्याची मुभा देण्यात आल्यानंतर अंध प्रवाशांनी रेल्वेगाड्यांनी प्रवास केला. काहींनी सुखद प्रवास झाल्याची प्रतिक्रिया दिली; मात्र प्रवास करण्याच्या मर्यादित वेळांमुळे प्रवासात अडचणी येत असल्याच्या प्रतिक्रिया अंध प्रवाशांनी दिल्या. उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये अंध-अपंगांसाठी स्वतंत्र डबा आहे. त्यामुळे प्रवासात गर्दीचा त्रास सहन करावा लागत नाही. अंधांसाठीच्या डब्याची स्थानकातील जागा ओळखण्यासाठी एका विशिष्ट आवाजाची (बिप) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासातील मोठी चिंता मिटल्याची प्रतिक्रिया काही प्रवाशांनी दिली. 

गेले 10 महिने बसगाड्यांमधून प्रवास करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. विविध आकारांतील आणि उंचीच्या गाड्या बसथांब्यांवर येत असल्याने रोज दरवाजे आणि बसगाड्यांच्या पायऱ्यांचा अंदाज अंधांना येत नव्हता. याशिवाय बसगाड्यांचा क्रमांक आणि ठिकाणांविषयीची माहिती सातत्याने विचारावी लागत होती. उपनगरी रेल्वेगाड्या सुरू झाल्याने हे परावलंबन दूर झाल्याचे एका प्रवाशाने सांगितले. 

मुंबईत जीवनोपयोगी सामग्री खरेदी करण्यासाठी, पुस्तके घेण्यासाठी जावे लागते. लोकल सुरू झाल्याने वाहतुकीचा खर्च आणि वेळही वाचला आहे. वेगवान प्रवास झाल्याने कामे तातडीने होत आहेत; मात्र अपंग प्रवाशांसाठी उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये प्रवासाला पूर्ण वेळ देण्याची मागणी मुंजाबा शिंगारे यांनी दिली.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

special beep arranged identify location blind Railway passenger

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT