anil deshmukh esakal
मुंबई

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच; 29 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

मनी लाँड्रिंग प्रकरणात देशमुख यांची चौकशी करण्यात येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून, न्यायालयाने अनिल देशमुखांसह सचिन वाझे, संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सीबीआयने देशमुखांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत देशमुखांसह इतरांना 29 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Anil Deshmukh Gets 14 Days Judicial Custody)

न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख, कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे तसेच मुंबई पोलीस सचिन वाझे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणात देशमुख यांची चौकशी करण्यात येत आहे. अनिल देशमुखांना 100 कोटी वसुलीच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर सीबीआय कोर्टाच्या निर्णयानंतर अनिल देशमुखांना सीबीआयने ताब्यात घेतले होते. ईडीने 29 डिसेंबर 2021 रोजी अनिल देशमुख आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती, तेव्हापासून ते तुरुंगातच आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT