मुंबई

आता मुंबई मेट्रो तुम्हाला सांगेल पत्ता, MMRDA राबवणार भन्नाट आयडिया

सुमित बागुल

मुंबई : मुंबई मेट्रोकडून एक अनोखं पाऊल उचललं जाणार आहे. या नवीन प्रयोगामुळे मुंबईकरांना आपण कुठे आहोत, तसेच त्या मार्गावरील कोणतीही जागा शोधणे सहज आणि सोपं होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून विविध मेट्रो प्रकल्पांचे काम जोरात सुरु आहे. या दरम्यान मुंबई मेट्रोकडून मेट्रो खांबांवर आता कलर कोडिंग केलं जाणार आहे. मेट्रो मार्गांची उभारणी करण्यासाठी बनवलेल्या मेट्रोच्या सिमेंट खांबांवर विशेष नंबर्स टाकण्यात येणार आहेत. या क्रमांकांसोबतच विशेष कलर कोडिंगही करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा नवीन प्रयोग सर्वात आधी ट्रो ७ आणि आणि मेट्रो २ ए वर राबवण्यात येणार आहे. मेट्रो ७ च्या खांबांवर लाल तर मेट्रो २ ए वर खांबांवर पिवळा रंग देण्यात येणार आहे असं समजतंय. 

मेट्रो परिसरात प्रचंड गर्दी असते. अशात खांबांवरील कलर कोडींगमुळे आणि त्यावरील क्रमांकांमुळे प्रवाशांना आपण नक्की कुठे आहोत त्याचसोबत आसपासच्या इमारती त्याचसोबत विविध दुकानदारांना देखील याचा फायदा होणार आहे. येत्या काळात MMRDA मार्फत सदर संकल्पना सर्व मेट्रो मार्गांवर राबवण्यात येणार आहे असं सांगण्यात येतंय.

special color coding on the polls of mumbai metro will now tell exact location

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT