मुंबई

गेल्या वर्षी आजच्याच दिवशी ठाण्यात आढळलेला कोरोनाचा पहिला रुग्ण; एक वर्षानंतर काय आहे परिथिती

राहुल क्षीरसागर

ठाणे : गेल्या वर्षी पुणे, मुंबईची द्वारे ठोठावल्यानंतर मार्च महिन्याच्या मध्यावर ठाणे शहरातही कोरोनाचा शिरकाव झाला. ठाण्यात 13 मार्च 2020 रोजी पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.

आरोग्य यंत्रणासह जिल्हा, पोलिस प्रशासन यांची उपाययोजनांसाठी धावपळ सुरू झाली. काय करावे याचे विवंचन सुरू झाले. मुंबईप्रमाणेच धावत्या ठाणे शहरासह संपूर्ण जिल्ह्याला ब्रेक लागला. त्यानंतर दररोज वाढणारे रुग्ण अपुऱ्या आरोग्य सुविधा, रुग्णालयातील अपुरी खाटांची संख्या, रुग्णवाहिकेअभावी रुग्णांची होणारी फरपट, मृत्यू या सर्व गोष्टींना वर्ष पूर्ण होत आहेत. सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्‍यात येत असल्याचे चित्र होते; मात्र फेब्रुवारी अखेरपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने वर्षपूर्तीनंतरही कोरोनाची धग, भीता अजूनही कायम असल्याचे चित्र आहे. 

मार्च महिन्याच्या मध्यावर ठाणे महापालिकेतील कळवा विभागात कोरोना संशयित रुग्ण आढळून आल्यानंतर त्या रुग्णाला ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी मुंबईला पाठविण्यात आले. त्याचा अहवाल सकारात्मक आला आणि आरोग्य विभाग जिल्हा प्रशासनासह सर्वच यंत्रणा सतर्क झाली. हा आजार नवीन असल्याने व त्यावर कोणते औषध आणि उपचार पद्धती याची पुरेशी माहिती आरोग्य विभागाला नसताना ठाणे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांनी या महामारीशी मुकाबला करण्यासाठी सज्ज झाले होते. मार्च महिन्यानंतर एप्रिल, मे, जून आणि जुलै या महिन्यात झालेल्या कोरोना आजाराचा उद्रेक यामुळे अनेकांना रुग्णालयात बेड्‌स मिळविण्यापासून ते रुग्णवाहिका मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. अनेकांचे रुग्णवाहिका व रुग्णालयातील बेड्‌स अभावी मृत्यू ओढवल्याच्या घटना देखील घडल्या आहे. सरकार ते प्रयत्नपूर्वक कोरोनाला आटोक्‍यात आणल्याचे फेब्रुवारीपर्यंतचे चित्र होते. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसपासून पुन्हा कोरोनाने वाढण्यास सुरुवात झाली. 

ठाणे जिल्ह्यात ठाणे महापालिका क्षेत्रात 13 मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्यानंतर 14 मार्च रोजी कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाने शिरकाव केला. त्यामुळे एकट्या मार्च महिन्यातील 19 दिवसांत 35 कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली होती. जसा एप्रिल महिना उजाडला तसा या आजाराचा फैलाव अधिक तीव्रतेने होऊ लागला. या महिन्यात एक हजाराच्या आसपास गेली होती. त्यामुळे जिल्ह्यात 49 दिवसांत सुमारे एक हजार 200 च्या आसपास गेली. 

प्रशासन सज्ज 

गेल्या वर्षी जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय कोरोना रुग्णालय घोषित केले. त्यावेळी त्या ठिकाणी 250 बेड्‌स उपलब्ध होते. मे महिन्याच्या अखेरीस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याची बाब लक्षात घेत, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्‍यांमध्ये 1 हजार 516 खाटांचे कोविड केअर सेंटरच्या जोडीला 490 खाटांचे डेडिकेट कोविड हेल्थ सेंटर आणि 420 खाटांचे डेडिकेट कोव्हिड हॉस्पिटलची, अशी अडीच हजार बेड्‌सची क्षमता असलेली रुग्णालये उभारण्यात आली. 

special report one year of corona in thane what is covid condition after one year in thane

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT