file photo
file photo 
मुंबई

होली है... चाकरमान्यांसाठी रेल्वेकडून खूशखबर!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील चाकरमान्यांना होळीसाठी कोकणात जाता यावे म्हणून कोकण रेल्वे विशेष गाड्या चालवणार आहे. कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेल ते करमाळी या स्थानकांदरम्यान विशेष गाड्या धावतील.
 
एलटीटी-करमाळी ही विशेष साप्ताहिक गाडी दर शुक्रवारी (6, 13, 20 आणि 27 मार्च) चालवण्यात येईल. ही गाडी एलटीटी येथून रात्री 8.45 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता करमाळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी करमाळी-एलटीटी विशेष गाडी दर रविवारी (8, 15, 22 आणि 29 मार्च) चालवण्यात येईल. ही गाडी करमाळीहून दुपारी 1 वाजता निघून एलटीटी येथे मध्यरात्री 12.20 वाजता दाखल होईल. 

हेही वाचा ः आता जेवढा कराल 'कचरा' तेवढा भरावा लागेल 'टॅक्स'

एलटीटी-करमाळी साप्ताहिक विशेष गाडी 21 फेब्रुवारी आणि 6 मार्चला सोडण्यात येईल. ही गाडी एलटीटी येथून मध्यरात्री 1.10 वाजता निघेल आणि दुपारी 12.30 वाजता करमाळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी करमाळीहून दुपारी 1 वाजता निघालेली गाडी मध्यरात्री 12.20 वाजता एलटीटी येथे दाखल होईल. 

हेही वाचा ः अंटार्टिकामध्ये आतापर्यंतच्या सर्वात जास्त तापमानाची नोंद..

ही विशेष गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्‍वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिविम या स्थानकांत थांबेल. 

पनवेलहून चार गाड्या 
पनवेल-करमाळी विशेष साप्ताहिक गाडी 7, 14, 21 आणि 28 मार्चला धावणार आहे. पनवेल स्थानकातून रात्री 9 वाजता निघणारी ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता करमाळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी करमाळीहून सकाळी 10.30 वाजता सुटणारी गाडी रात्री 8.15 वाजता पनवेल स्थानकात दाखल होईल. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT