cause of accident on Samruddhi Highway Accident after 9 months there is no implementation of CCTV installation esakal
मुंबई

Samruddhi Highway : ‘समृद्धी' होणार अधिकच सुसाट; तयार झाला तब्बल इतक्या किलोमीटरचा बोगदा!

सकाळ डिजिटल टीम

Samruddhi Highway Biggest Tunnal: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील पॅकेज १४ चे १३ किलोमीटरचे काम ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने नियोजित वेळेच्या तीन महिने आधीच पूर्ण केले आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा आणि देशातील सर्वात जास्त रुंदीचा आठ किलोमीटरचा अत्याधुनिक सुविधा असलेला फायरप्रूफ बोगदा तयार करण्यात आला आहे.
समृद्धीच्या दोन्ही मार्गांच्या बोगद्यांना जोडणारे २६ क्रॉस पॅसेज उभारण्यात आले आहेत. लांबीने मोठ्या असलेल्या बोगद्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मुंबई-नागपूर महामार्गावरील भुयारी मार्गाला जोडून ५०४ लांबीचा एक आपत्कालीन रस्ता तयार करण्यात आला आहे. आपत्कालीन मार्गाने वाहनांना नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पोहचता येणार आहे. अंगणवाडी, फुगाळे, टोकरखंड, वशाळा इत्यादी गावांना जोडून पुढे नाशिक राष्ट्रीय महामार्गाला तो जोडण्यात आला आहे.

७०१ किलोमीटरच्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर एकूण १६ पॅकेज आहेत. पिंपरी सद्रोद्दीन-वशाळा बुद्रुकदरम्यान दोन किलोमीटर उंच पुलाची निर्मिती, आठ किमी लांबीचा बोगदा आणि तीन किमीचा रस्ता करण्यात आला आहे. एकूण १३ किलोमीटर महामार्गाची निर्मिती वेळेपूर्वीच करून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे तो सुपूर्द करण्यात आला आहे, असे ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प व्यवस्थापक शेखर दास यांनी सांगितले.


समृद्धी महामार्गाच्या १४ व्या पॅकेज निर्मितीमध्ये राज्यातील सर्वाधिक मोठा लांबी-रुंदीचा बोगदा आणि त्यानंतर सर्वाधिक ६० मीटर उंचीच्या पुलाची निर्मितीही करण्यात आली आहे. एकूण १.२९७ किलोमीटरचा पूल आहे. संपूर्ण फॉरेस्ट झोन असलेल्या डोंगर-दऱ्यांमध्ये उंच पुलाची जाग्यावरच निर्मिती केली असल्याचे सांगण्यात आले.

कॅमेरा आणि मोबाईल नेटवर्क
- बोगद्यात आपत्कालीन परिस्थितीसाठी लावण्यात येणाऱ्या सुविधांचे नियंत्रण कंट्रोल रूममधून करता येणार आहे. त्यासाठी कोणत्याही मनुष्यबळाची गरज नसेल.
- बोगद्यात ३६० अंशातून फिरणारा कॅमेरा व मोबाईल नेटवर्कसाठी लिकी केबल यंत्रणा बसवण्यात आली आहे.
- ट्रॅफिक कंट्रोल मॅनेजमेंट आणि फायर फायटिंग सिस्टीमसह अनेक अत्याधुनिक यंत्रणा ‘स्काडा’सोबत जोडून त्यांचे नियंत्रण कंट्रोल रूममधून करता येणार आहे.
- बोगद्यात फायर अलार्म, ॲक्सेस कंट्रोल (फायरप्रूफ डोअर) आणि रेडिओ कम्युनिकेशन सिस्टीमही आहे.


बोगद्यात अग्निरोधक यंत्रणेची सर्वाधिक काळजी घेण्यात आली आहे. बोगद्यात ६० अंशांपेक्षा तापमान वाढल्यास ऑटोमॅटिक हाय प्रेशर मिस्ट यंत्रणा स्वयंचलित पद्धतीने सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT