Raigad Zilha Parishad sakal media
मुंबई

अलिबाग : दहावी बारावीच्या परीक्षेसाठीची पायपीट थांबणार

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST bus employee strike) आणि कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षार्थींची (ssc and hsc exam) गैरसोय होण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांची संख्या पूर्वीपेक्षा पाच पटीने वाढ करण्यात आली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या (Raigad Zilha Parishad) शिक्षण विभागाने बारावीसाठी ४६ मुख्य आणि १४४ उपकेंद्र केली आहेत; तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ७४ मुख्य केंद्र आणि ४१२ उपकेंद्र सुरू करण्यात आली आहेत. ज्या शाळांमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षार्थींची संख्या १५ पेक्षा कमी आहे, त्यांच्या सोयीसाठी उपकेंद्र आहेत.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन परीक्षा केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना लांबच्या परीक्षा केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाही, याचीही काळजी घेतली गेली आहे. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे गावागावांत येणाऱ्या बस बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ शकते. या सर्व गोष्टींचा विचार करून पूर्वीच्या परीक्षा केंद्रापेक्षा साधारण पाच पट वाढ करण्यात आल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.

दोन वर्षे कोरोनामुळे ऑफलाईन परीक्षा झाल्या नव्हत्या. तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असताना माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या ऑफलाईन परीक्षा काही दिवसांतच सुरू होत असून यासाठीचे वेळापत्रक शिक्षण विभागाने प्रसिद्ध केले आहे. कॉपीसारखे गैरप्रकार टाळता यावेत यासाठी ६ भरारी पथके सुरू करण्यात आली आहेत.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व खबरदारी घेतली आहे. ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या १५ पेक्षा कमी आहे, अशा शाळांमधील विद्यार्थ्यांना जवळच्या उपकेंद्रात जाऊन परीक्षा देता येणार आहेत. त्याचबरोबर गैरप्रकार टाळण्यासाठीही भरारी पथके सतर्क राहणार आहेत.
- ज्योत्स्ना शिंदे-पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी, रायगड जिल्हा परिषद.

दृष्टिक्षेप

- बारावीची परीक्षा चार मार्चपासून
- या परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून ३१ हजार ८७३ परीक्षार्थी
- दहावीची परीक्षा १५ मार्चपासून सुरू होत आहे.
- या परीक्षेसाठी ३३ हजार ५०० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT