crore rupees fraud allegations
crore rupees fraud allegations sakal media
मुंबई

एसटी बँकेच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप; बॅंक कर्मचाऱ्यांकडून कोटींचा अपहार ?

प्रशांत कांबळे

मुंबई : एसटीच्या बँकेत (ST Bank) ३३ वर्षे लिपिक पदावरून निवृत्त झालेले जळगावचे महेंद्र शर्मा यांनी बँकेच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. बँकेचे महत्त्वाचे निरीक्षक पद रिक्त असल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून ऑडिट झाले नाही. त्याचा फायदा घेऊन बँक कर्मचाऱ्यांकडून कोटींचा अपहार (crore rupees fraud) केला जात आहे. शिवाय अपहारकर्त्यांची साधी पोलिस तक्रार न करता बँक प्रशासन अपहारकर्त्यांची फक्त बदली करत आहे. त्यामुळे संगनमताने भ्रष्टाचार (corruption) सुरू सुरू असून भ्रष्टाचाऱ्यांना अभय दिले जात असल्याचा आरोप शर्मा यांनी केला आहे. यासंदर्भात शर्मा यांनी एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (shekhar channe) यांना पत्र पाठवून कारवाईची मागणी केली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकार कायद्यातील तरतुदीनुसार एसटी बँकेकरिता १२ बँक निरीक्षक पदांची मंजुरी दिली आहे; परंतु या पदावरील व्यक्ती निवृत्त झाल्यानंतर अद्याप पद भरतीच घेतली गेली नाही. त्याचा फायदा घेऊन औरंगाबाद, चिपळूण, पंढरपूर, मुख्य कचेरी, मिरज, नागपूर, अमरावती, पुसद यासह बँकेच्या अनेक शाखांमध्ये कोट्यवधींचा अपहार झाला आहे.

याला बँक प्रशासनाची सहमती आहे. या प्रकरणात बँकेची अधिकारी युनियन व कर्मचारी युनियनचे संगनमत असल्याने अपहारासंदर्भात अद्याप कायदेशीर कारवाईच झाली नाही. यापूर्वी बँकेच्या प्रत्येक शाखेत सुमारे २० बँक कर्मचारी असायचे. मात्र आता बोटावर मोजण्याइतके कर्मचारी असल्याने खातेदारांना, ठेवीदारांना सेवा मिळत नाही. शिवाय २०१६ मध्ये प्रशासनाने घेतलेल्या खातेनिहाय बढती परीक्षेतही गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप शर्मा यांनी केला आहे.

बँकेचे व्यवस्थापन आणि गैरकारभाराबाबतची तक्रार अद्याप प्राप्त झाली नाही. मात्र, रिझर्व बँकेच्या नियमानुसार एसटी बँकेचे ऑडिट नियमित सुरू आहे, अशी तक्रार आल्यास त्याची गंभीर दखल घेऊन चौकशी करून कारवाई केली जाईल.
- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ.

एसटी बँकेत ३३ वर्षे लिपीक पदावर काम केले आहे. त्यामुळे ज्या बँकेत आयुष्य घालवले त्या बँकेत चुकीचे काम होताना बघवत नाही. बँकेला वाचवण्याच्या एकमेव उद्देशाने तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.
- महेंद्र शर्मा, निवृत्त लिपीक, एसटी बँक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT