Accident News Esakal
मुंबई

Accident News: कोकणाकडे जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात, एका प्रवाशाचा मृत्यू तर १९ जण जखमी

मुंबई-गोवा महामार्गावरती एस.टी .बस आणि कंटेनर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबई-गोवा महामार्गावरती एस.टी .बस आणि कंटेनर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. एस.टी बसने कंटेनरला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात घडला आहे. माणगाव जवळ असणाऱ्या रेपोली येथे पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.

या भीषण अपघातात एस.टी बसमधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर, 19 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन प्रवासी गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

तर बसमधील इतर जखमी प्रवाशांवर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईहून राजापूरकडे निघालेल्या एसटी बसला हा अपघात झाला आहे. अपघातात बसच्या पुढच्या भागाचं मोठं नुकसान झालं आहे.

दरम्यान गणेशोत्सवासाठी मुंबईहून शहरातील अनेक जण गावी निघाले होते. अपघाताची माहिती मिळाताच वाहतूक पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य सुरु केले. अपघातानंतर काही वेळ महामार्गावरती वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र महामार्गावरील वाहतूक आता सुरळीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT