मुंबई

बेस्ट बसेससाठी सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे हाल; रस्त्यावर उतरत जोरदार आंदोलन

तुषार सोनवणे

मुंबई - मुंबईत बेस्ट सेवेसाठी दाखल झालेल्या 500 एसटी कर्मचाऱ्यांची गोरेगाव येथील रॉयल पाम या हॉटेलमध्ये सोय करण्यात आली होती. हॉटेलमधील अस्वच्छता आणि अन्नपदार्थांमध्ये सापडलेल्या अळ्या, या कारणावरून एसटी वाहक आणि चालकांनी रविवारी रात्री आंदोलन केले.

आरे कॉलनीतील रॉयल पाम हॉटेलमध्ये बेस्ट वाहतूकीसाठी आलेल्या चालक आणि वाहकांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. हे हॉटेल याआधी क्वॉरंटाईन सेंटर होते. सध्या या हॉटेलमधील खोल्यांची साफसफाई केली जात नाही. येथे अनेक चालक वाहकांना कोरोनाची लागण झाली होती. एवढे होऊन देखील  त्यांना मिळणाऱ्या निकृष्ट जेवणाची दखल एसटी प्रशासनाकडून घेतली जात नव्हती. रविवारी रात्री या कर्मचाऱ्यांनी याविरोधात आंदोलन केले.

कोरोनामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवा बंद झाली होती. परंतु लॉकडाऊन शिथील होत असल्याने बेस्ट सेवाही सुरू झाली होती. परंतु रेल्वे सेवा बंद असल्याने बेस्टवर ताण येत होता. त्यामुळे बेस्ट सेवेसाठी एसटी कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले होते. परंतु एसटी कर्मचाऱ्यांचे मुंबईत हाल होत असल्याचा आरोप अनेक वेळा होत होता. त्यांना योग्य राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था नसल्याचे त्यांनी वारंवार म्हटले होते. त्यामुळे रविवारी या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal : बंगालमधील मदरशांमध्येही ‘वंदे मातरम’ गाणे बंधनकारक; शुभेंदू अधिकारी यांचा मोठा!

Raj Thackeray : राज ठाकरेंना मोठा दिलासा, १८ वर्षे जुन्या प्रकरणात निर्दोष मुक्तता

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये एका विवाहितेचा आठवेळा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना उघड

Team India vs Afghanistan: अचानक बदललं वेळापत्रक! BCCI ने जाहीर केल्या नव्या तारखा, पहा संपूर्ण वेळापत्रक

'प्रेम करावं तर अशोक मामांसारखं', निवेदिता सराफ यांना साडीत पाहून दिली हटके रिअ‍ॅक्शन, Viral Video

SCROLL FOR NEXT