मागील तीन महिन्यांपासून सुरू असणाऱ्या एसटी संपाबाबत आज अंतिम निर्णय येण्याची शक्यता वाढली आहे. राज्यभरातील एसटी कर्मचारी संघटनांचे प्रमुख मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या विलनीकरणाला नकार दिल्यानंतर संप चिघळण्याची शक्यता होती.
मात्र, राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना जवळपास ४१ टक्क्यांची पगारवाढ देऊन नोकरीत पुन्हा रूजू होण्यासाठी आवाहन केलं. मात्र, अद्याप काही संघटना संपावर ठाम आहेत. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत असल्याने संप चालू ठेवायचा, की मागे घ्यायचा यावर मोठा निर्णय येणं अपेक्षित आहे. (ST Worker Strike)
महामंडळाचा नवा पर्याय
एसटी काममहामंडळाचा नवा पर्यायगारांचा संप सुरू असतांना आता एस टी महामंडळाने नवा पर्याय काढला आहे. एस टी सेवा सुरळीत सुरू व्हावी, यासाठी यांत्रिक कर्मचारी व सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांचा संप काळात चालक म्हणून तर वाहतूक नियंत्रक यांचा वापर वाहक म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबतच्या निर्णयाच्या परिपत्रकामध्ये म्हटलंय की, राज्य परिवहन महामंडळातील कर्मचा-यांनी बेकायदा संप पुकारला आहे, त्यामध्ये मुख्यत्वे चालक व वाहक यांचा समावेश असल्याने अत्यल्प प्रमाणात वाहने चालनात येत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त वाहने चालनात आणण्याकरीता विविध उपाययोजना अमलात आणण्यासाठी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्यासमवेत सर्व अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेअंती यांत्रिक कर्मचारी व सहाय्यक वाहतूक निरिक्षक यांना उजळणी प्रशिक्षण देऊन त्यांचा वापर संपकाळात 'चालक' तसेच वाहतूक नियंत्रकांचा 'वाहक' म्हणून वापर करण्याबाबत निर्णय झाला आहे.
संप बेकायदेशीर
एसटी महामंडळ प्रशासनानं कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप बेकायदेशीर (ST Strike Illegal) आहे, यासाठी राज्यभरातील कामगार न्यायालयात जवळपास दीड महिन्यांपासून वेगवेगळ्या ठिकाणी तक्रार अर्ज दाखल केले आहेत. औद्योगिक विवाद कायद्यानुसार लोकोपयोगी सेवा असल्यास सहा आठवडे अगोदर संपाची नोटीस (notice of intimation) देणं बंधनकारक आहे. परंतु एसटी महामंडळातील सध्या सुरू असलेल्या संपात कोणतीही कायदेशीर नोटीस देण्यात आलेली नसल्याने अखेर मुंबई कामगार न्यायालयाने (labor court) संप बेकायदा असल्याचं घोषित केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.