Mumbai sakal
मुंबई

दिवाळीपूर्वी एसटी कर्मचारी उपसणार संपाचे हत्यार ?

राज्यातील २२ संघटनांची संयुक्त कृती समिती तयार

प्रशांत कांबळे ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई : तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, वेतनवाढ, घरभाडे भत्ता मिळत नसल्याने दिवाळीपूर्वीच (Diwali) कर्मचारी संघटना संपाचे हत्यार उपसण्याच्या तयारीत आहेत. कोरोना काळात आर्थिक संकटामुळे २५ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर ३०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा कोरोनाने (Corona) मृत्यू झाल्यानंतर राज्यातील २२ एसटी(S.T) कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन प्रलंबित मागण्यांसाठी कृती समिती तयार केली आहे. त्यानुसार लवकरच संपाची घोषणा करण्यात येणार आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन अत्यल्प आहे. शिवाय वेतन वेळेवर मिळत नसल्याने कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. मंगळवारी (ता. १९) पार पडलेल्या २२ एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीच्या बैठकीचे समाज माध्यमांवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते.

राज्य एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि सरचिटणीस हनुमंत ताटे, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे सरचिटणीस मुकेश तिगोटे, राज्य एसटी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष विजय मालोकार, कास्ट्राईब एसटी कामगार संघटनेचे सुनील निरभवणे आणि महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी संयुक्त कृती समितीच्या बैठकीत आपल्या भूमिका मांडल्या.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी तयार करण्यात आलेल्या संयुक्त कृती समितीतून बैठक संपताच संघर्ष एसटी कामगार युनियनने माघार घेतली आहे. कृती समितीच्या मागण्या तात्पुरत्या आहेत. कृती समितीचे कामगारांच्या मागण्यांवर समर्थन असेल, शिवाय समितीच्या भूमिकांना आम्ही विरोध करणार नाही. मात्र, कृती समितीसोबत आम्ही जाणार नसल्याचे संघर्ष एसटी कामगार युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: विराट कोहलीचा चौकार अन् मोडला राहुल द्रविडच्या नावावरील मोठा विक्रम! इंग्लंडमध्येही ठरला 'किंग'

IND vs ENG 2nd ODI: अनपेक्षित... भारतीय संघात एक बदल; विजयी संघात बदल करण्याची वेळ का आली? शुभमन गिल म्हणाला...

भारतातून OnePlus ची एक्झिट? 2027 पर्यंत कंपनी बंद होणार असल्याची चर्चा; ज्यांच्याकडे आत्ता मोबाईल आहे त्यांनी काय करायचं? वाचा

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतनची न्यायालयीन कोठडी कायम

Varandha Ghat Landslide Risk: वरंधा घाटात दरडींचा धोका कायम; रस्त्याशेजारील मातीचे ढिगारे तातडीने हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT