मुंबई

CAA आणि NRC बद्दल 'ही' आहे राज ठाकरेंची भूमिका..

सकाळवृत्तसेवा

मुंबई -  २३ जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महामेळावा मुंबईत पार पडला. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी '...तर हिंदू म्हणून अंगावर धावून जाईन' असं वक्तव्य केलं होतं. एकंदरच हिंदुत्वाच्या ट्रॅकवर असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राजकारण येत्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशातच देशात CAA आणि NRC या दोन विषयांवरून मोठ्या प्रमाणात वादंग आहे. संपूर्ण देशभरात याविरोधात आणि समर्थनार्थ मोठे मोर्चे निघतायत, आंदोलनं होतायत. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष होतं. दरम्यान राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

CAA ला विरोध NRC ला पाठिंबा 

सुधारित नागरिकत्व कायद्याला (CAA) आपला विरोध आहे आणि NRC ला मात्र आपलं समर्थन आहे अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना बाळा नांदगावकर यांनी आपलं मत मांडलं आहे. यावर सविस्तर बोलताना, ''बेकायदा बांगलादेशींना हाकलून लावलं पाहिजे' हीच भूमिका राज ठाकरे यांनी कायम घेतलीये, पुण्यातदेखील राज ठाकरे यांनी हीच भूमिका घेतली होती, असं बाळा नांदगावकर म्हणालेत. 

भारतात अवैधरित्या राहणारे बांगलादेशी, पाकिस्तानी आणि आणखी कुणीही असोत सर्वांना या देशातून हाकलून द्या. दरम्यान ज्या भूमिका देशहितासाठी केंद्राने घेतल्यात, उदाहरणार्थ कलम ३७०, राम मंदिर याबाबत राज ठाकरे यांनी सरकारला पाठिंबा दिलाय. NRC ला देखील पाठिंबा आहे. त्यामुळे 'देशातील अवैध नागरिक भारताबाहेर जातील' अशीच राज ठाकरे यांची भूमिका आहे असं बाळा नांदगावकर यांनी म्हणटलंय. 

stand of Maharashtra Navnirman Sena chief raj thackeray on NRC and CAA

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli DCC Bank Election : सांगलीच्या राजकारणात मोठा उलटफेर! 1999 नंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे वर्चस्व संपले; काँग्रेसचे महेंद्र लाड नवे अध्यक्ष, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे तानाजी पाटील

Dadar Railway Station: दादर रेल्वे स्थानकाचं नाव बदलणार, सरकार मोठा निर्णय घेणार; मनसेचा आक्षेप

Government Tractor Scheme : ट्रॅक्टर खरेदीसाठी तीन लाखांचे अनुदान; सरकारची योजना, १५ डिसेंबरपर्यंत अर्जाची मुदत

Marathi News Live Updates : मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील धोकादायक मुसाफिरखाना इमारतीवर महापालिकेची कारवाई; इमारतीचे पाडकाम सुरू

Ahilyanagar News: भीषण आगीत पाच दुकाने खाक ;पाथर्डी तालुक्यातील भुतेटाकळी फाटा येथील घटना

SCROLL FOR NEXT