मुंबई

मुंबईच्या दोन मुलांची कमाल, सुरु केला कांदे, बटाट्याचा स्टार्टअप बिझनेस

स्टॅनफोर्ड मधील शिक्षण अर्ध्यावर सोडून सहा कोटी डॉलर्सचं फंडींग मिळवलं.

दीनानाथ परब

मुंबई: मुंबईच्या दोन युवकांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातील (Stanford university) शिक्षण अर्ध्यावर सोडून 'झेपटो' (Zepto) नावाची स्टार्टअप (Startup firm) कंपनी सुरु केली आहे. स्टॅनफोर्ड हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक नामांकीत विद्यापीठ आहे. आदित पालिचा (Aadit palicha आणि कैवल्य व्होरा हे दोघे विशीतील युवक आहेत. त्यांनी किराणा मालाची डिलिव्हरी करण्याच्या व्यवसायात उडी घेतली आहे. झेपटो कंपनी सुरु करुन काही महिनेच झाले आहेत.

व्यवसायाला चालना देण्यासाठी त्यांना सहा कोटी डॉलर्सचे फंडींग मिळाले आहे. झेपटोचे मुल्य सध्या २० ते ३० कोटी डॉलर्सच्या घरात आहे. वाय काँबिनेटर, ग्लेड ब्रुक कॅपिटल आणि लॅची ग्रुम यांन झेपटोमध्ये गुंतवणूक केली आहे. कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ आदित पालिचा यांनी ही माहिती दिली. एनडीटीव्ही ने हे वृत्त दिलं आहे.

बंगळुरु, दिल्ली आणि मुंबईतील काही भागांध्ये कांदे, बटाटे, कोथिंबीरीसह अन्य जीवनावश्यक वस्तू दहा मिनिटात ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा दावा कंपनीने केला आहे. मोबाइलधारक कंपनीचे मुख्य लक्ष्य आहे. जास्तीत मोबाइलवरुन ऑडर्स मिळवण्याचे उद्दिष्टय झेपटोने ठेवले आहे. ऑनलाइन शॉपिंगची वाढती बाजारपेठ ध्यानात ठेऊन या दोन तरुणांनी हे स्टार्ट अप सुरु केलं आहे. ग्रॉफर्स, डुनझो आणि स्विगी या कंपन्यांचं झेपटोसमोर मोठं आव्हान आहे. 'पिकली' या स्टार्टअपलाही सध्या चांगला प्रतिसाद मिळतोय.

ग्रॉफर्सनेही १० मिनिटात डिलिव्हरीचं आश्वासन दिलं आहे. स्पर्धा असली, तरी आपण यशस्वी होऊ असे पालिचाला विश्वास आहे. "स्विगी, ग्रॉफर्स यांना बिझनेस उभारायला सात वर्ष लागली. आम्ही तेच दीड वर्षाचे लक्ष्य ठेवलं आहे" असे पालिचा म्हणाला. पालिचा आणि व्होरा दोघे वयाच्या आठव्या वर्षापासून मित्र आहेत. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींगला त्यांनी प्रवेश घेतला होता. पण एक दिवस त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून उद्योजक बनण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ते मुंबईत परतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: ‘दगडूशेठ गणपती ट्रस्ट’ला फरासखाना ठाण्याची जागा मिळणार, पुणे पोलिसांकडून गृह विभागाकडे प्रस्ताव सादर

State Government: बंदीवान मच्छीमारांच्या कुटुंबांना मदत, ८९ दिवसांसाठी २६ हजार रुपये; राज्य सरकारचा निर्णय

'वचन दिले तू मला' मालिकेतून अभिनेत्याची एक्झिट; मिलिंद गवळींनी शेअर केली खास पोस्ट ,म्हणाले- खूप त्रास

Latest Marathi News Live Update : कलम २९ए(९) हे राजकीय पक्षाच्या नोंदणीनंतर लागू होते, परंतु त्यात नमूद केलेल्या माहितीपुरतेच ते मर्यादित आहे - न्यायासन

Inspiring Farmer Story : सिमला मिरचीची शेती अन् 20 लाखांचे उत्पन्न! पारंपरिक शेतीला फाटा देत माजलगावच्या ज्योती डक यांनी 4 एकर ढोबळी मिरचीतून कमावले लाखो रुपये

SCROLL FOR NEXT