मुंबई

राज्य शिक्षण मंडळाची दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आजपासून

तेजस वाघमारे

मुंबई, ता. 20  : राज्य शिक्षण मंडळाची दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आजपासून  (शुक्रवार,  ता. 20) सुरू होत आहे. या परीक्षेसाठी यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे.
मंडळाच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या आणि श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा आजपासून सुरू होत आहे.

दरवर्षी जुलैमध्ये फेरपरीक्षा घेण्यात येते, तर सप्टेंबरमध्ये निकाल जाहीर होते. या विद्यार्थ्यांना त्याच शैक्षणिक वर्षात पुढील वर्गात प्रवेशही मिळतो. यंदा मात्र, करोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा लांबल्या. या फेरपरीक्षेला दहावीच्या 42 हजार 634 विद्यार्थ्यांनी तर बारावीच्या 67 हजार 603 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील 672 केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा या परीक्षेची विद्यार्थी संख्या घटली असून साधारण एक ते सव्वा लाख विद्यार्थी फेरपरीक्षा देतात.

दहावी आणि बारावीच्या दोन्ही इयत्तांचे मार्चमधील परीक्षेचे वाढलेले निकाल, लांबलेली परीक्षा आणि शैक्षणिक वर्ष, करोनाची धास्ती यांमुळे परीक्षार्थींची संख्या काही प्रमाणात घटली असल्याचे बोलले जात आहे.

state education board SSC and HSC repeater exams starts from today

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकणवासीयांसाठी आनंदवार्ता! आता दररोज मुंबईहून कोकणात रेल्वे धावणार, प्रशासनाची मोठी घोषणा; वाचा सविस्तर

Commonwealth Games 2026: अपघातात पाय गमावला, बॉक्सरचा गोळाफेकपटू झाला... सोनम राणाने ऐतिहासिक सुवर्ण जिंकले; दोन रौप्यपदकही खात्यात आले

'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये रोमँटिक ट्विस्ट; समर-स्वानंदीची हटके डेट, मालिकेत स्वप्नील जोशीची एन्ट्री होणार

Latest Marathi News Live Update : खासदार पप्पू यादव यांच्या विरोधात भाजपाचे नागपुरात आंदोलन

Paithan Dog Menace: पाचोड परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; सात महिन्यांत ७३२ नागरिकांना श्वानदंश, प्रशासनावर निष्क्रियतेचे आरोप

SCROLL FOR NEXT