मुंबई

परवानगी मिळाली; आता कोरोना रुग्णांवर होणार आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार

भाग्यश्री भुवड

मुंबई : सौम्य किंवा मध्यम लक्षण असतानाच कोरोना रुग्णांवर या आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी उपचार पद्धतींचा वापर केला तर रुग्ण गंभीर स्थितीत जाणार नाही किंवा भविष्यात होणारा धोका टाळण्यास मदत होईल या कारणाने राज्य सरकारने कोरोना रुग्णांवर आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार करण्यास परवानगी दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्य सरकारकडून विविध टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. या टास्क फोर्समधील विविध शाखेतील तज्ज्ञांच्या माध्यमातून कोरोना रुग्णांवरील उपचारांविषयी निर्णय घेण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील आयुष टास्क फोर्सने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचा विचार करुन आता राज्य सरकारने कोरोना रुग्णांवर आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार करण्यास मान्यता दिली आहे. राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने यासंबंधी मार्गदर्शक सुचनांचे परिपत्रक जाहीर केले आहे.

अजूनही कोरोनावर ठोस उपचार निघालेला नाही. त्यामुळे, कोरोना रुग्णांवर आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी औषधांचा वापर करु देण्याची मागणी वेगवेगळ्या संघटनांनी सरकारकडे केली होती. त्यानुसार, टास्क फोर्सने सुचवलेल्या मार्गदर्शक सुचनांना राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी औषधे हे मानवी शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. त्यामुळे, या मार्गदर्शक सुचनांनुसार डॉक्टर रुग्णांवर उपचार करु शकणार आहेत. सेंट्रल काँन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथीकडून ही या उपचारांना मान्यता मिळाली आहे. अॅलोपॅथी उपचार प्रक्रिया सुरू असताना या औषधांचीही मदत घेता येईल.

- डॉ. जसवंत पाटील, सदस्य, आयुष टास्क फोर्स

उपचार पद्धतीची विशेष बाब -

या उपचार पद्धतीची विशेष बाब म्हणजे प्रत्येक रग्णाच्या लक्षणांनुसार यात औषधांचा समावेश आहे. सौम्य आणि मध्यम लक्षणे असतानाच कोरोना रुग्णांवर या उपचार पद्धतींचा अवलंब केल्यास रुग्ण गंभीर स्थितीत जाणार नाही किंवा भविष्यात जीवाला निर्माण होणारा धोका टाळण्यास ही मदत होणार आहे. 

दरम्यान, या बातमीला वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी ही दुजोरा दिला असून रुग्णांची परवानगी असल्यास डाॅक्टरांना हे उपचार करता येतील असेही त्यांनी सांगितले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

state gave permission to give ayurvedic unani treatment to covid patients with mild symptoms

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update : महाराष्ट्रात १४ मे ते २० मे दरम्यान जोरदार पाऊस होणार?; कोकणात पुढचे दोन दिवस महत्वाचे

वेंकटेश प्रसाद यांचा प्रयत्न फसला? बंगळूरची फायनल अचानक अहमदाबादला का गेली? कर्नाटक क्रिकेट संघटनेने व्यक्त केली जाहीर नाराजी

Latest Marathi News Live Update : नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर काँग्रसचे आंदोलन

Rabindranath Tagore History: ८८४ ते १८९२ दरम्यान टागोरांचे सोलापुरात वास्तव्य; साहित्यनिर्मितीला मिळाली नवी दिशा, तीन वेळा वास्तव्यातील ऐतिहासिक ठसा!

Maharashtra Education: विद्यार्थ्यांना 'इस्रो'सह 'नासा'ला भेटीची संधी; 'मुख्यमंत्री विज्ञान वारी' उपक्रम सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT