मुंबई

आता आरोग्यमंत्र्यांचा पारा चढला, मुंबईतल्या 'या' खासगी रुग्णालयांना नोटीस

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसनं मुंबईत थैमान घातलं आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मुंबईतले सरकारी आणि महापालिकेचे सर्व रुग्णालय भरले असून खाटांची कमतरता जाणवत आहे. कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव पाहता खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा राज्य शासनाने ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. परंतु, काही मोठी रुग्णालये खाटा रिकाम्या असतानाही गरजूंना खाटा उपलब्ध करुन देत नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. यामुळेच मुंबईतल्या हिंदुजा, जसलोक, बॉम्बे आणि लीलावती रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही नोटीस बजावली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

काही ठिकाणी रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून अपेक्षित ते सहकार्य होत नसल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. या तक्रारींची दखल घेऊन राजेश टोपे यांनी काल रात्री मुंबईतील खासगी रुग्णालयांना अचानक भेटी दिल्या. मंगळवारी पहाटे दोन वाजेपर्यंत आरोग्यमंत्री रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेबाबत माहिती घेतली. 

रुग्णालयांनी रुग्णांना खाटा उपलब्ध करुन दिल्या नाहीत, तर कायदेशीर कारवाई करु, असा इशाराही राजेश टोपे यांनी दिला आहे. तसंच रुग्णांना दिलेल्या खाटांची अचूक माहीती रुग्णालय प्रशासनाने जाहीर फलकावर द्यावी. राज्य शासनाच्या नियमांचे पालन केलेच पाहिजे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात साथ रोग नियंत्रण कायद्याखाली खासगी रुग्णालयांना 80 टक्के खाटा ठरवलेल्या दरात आणि गरीबांसाठी 10 टक्के खाटा उपलब्ध करून देणं बंधनकारक आहे. आरोग्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये चारही रुग्णालयात काही बाबींची अपूर्णता आढळून आल्यानं राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सरकारच्या आदेशाचं पालन खासगी रुग्णालयांकडून होत नसल्याचं आढळून आल्यानंतर सोमवारी रात्री आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या रुग्णालयांना अचानक भेट दिली. मंगळवारी पहाटे दोन वाजेपर्यंत आरोग्यमंत्री रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेबाबत माहिती घेत होते. सुरूवातीला त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलला भेट दिली. तिथे खाटांच्या उपलब्धतेबाबत जाहीर फलक नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली. रुग्णालये चार्जेसचे चार्टही लावत नसल्याचं समोर आले आहे. तसंच रुग्णालयातील एकूण खाटा, 80 टक्केनुसार दिलेल्या खाटा, शिल्लक खाटा यांची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी जसलोक, हिंदुजा, लिलावती या रुग्णालयांनाही भेटी दिल्या.  राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.

रात्री दहाच्या सुमारास सुरू झालेली ही मोहिम पहाटे दोन पर्यंत सुरू होती. रुग्णांना खाटा नाकारू नका. त्यांना वेळेवर उपचार द्या. शासनाला सहकार्य करा, अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. 

आरोग्यमंत्री म्हणाले की, मुंबईतल्या गरजू आणि गरीब रुग्णांना रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध झाले पाहिजेत. रुग्णालयांनी चार्जेसचा चार्ट लावला पाहिजे. रुग्णालयांना नोटीस पाठवून गरजूंना खाटा मिळतात की नाही, आदेशांचं पालन होत आहे की नाही याची शहानिशा करून घेत आहोत. या रुग्णालयामध्ये रुग्णांना खाटा उपलब्ध असतील तर त्या रुग्णांना मिळायलाच पाहिजेत. मी आरोग्यमंत्री या नात्याने स्वत: रुग्णालयांना भेट दिली आणि हे सहन केलं जाणार नाही असा संदेश देण्याचा प्रयत्न केला, राजेश टोपे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! CJP च्या दोन मागण्या सरकारकडून मान्य, तिसरीसाठी उद्या पर्यंतची मागितली वेळ, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलीस चौकीसमोरच गोळीबार, तीन राऊंड फायर, एक जण जखमी

Crime News: पहिल्या पतीचं निधन, दुसऱ्यानं सोडलं; नंतर पत्नीनं तिसऱ्या नवऱ्याला जिवंत जाळून संपवलं, धक्कादायक कारण समोर

Vaibhav Sooryavanshi : वैभवने विश्वविक्रमानंतर 'A' अक्षर का दाखवले? जाणून घ्या सेलिब्रेशनमागची हृदयस्पर्शी गोष्ट

Pune Crime: पुण्यात पोलीस चौकीसमोरच तरुणावर झाडल्या गोळ्या, धक्कादायक घटनेने शहरात खळबळ; नेमंक काय घडलं?

SCROLL FOR NEXT