मुंबई

तीन बड्या अभिनेत्री, तीन मोठी वक्तव्य; दीपिका, सारा आणि रियाचं स्टेटमेंट वाचा

सुमित बागुल

मुंबई : NCB मार्फत आज तीन बड्या अभिनेत्रीची ड्रग्स प्रकरणी चौकशी केली जातेय. या चौकशीदरम्यान अभिनेत्री दीपिका पदुकोण, अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेत्री सारा अली खान या तिघांनीही मोठे खुलासे केलेत. या अभिनेत्र्यांनी काही गोष्टींची कबुलीही दिली आहे. 

काय म्हणाली दीपिका पदुकोण  : 

दीपिका पदुकोण आज सकाळी १० वाजण्याच्या दहा मिनिटं आधीच NCB कार्यालयात पोहोचली. दहा वाजता तिची चौकशी सुरु होणार होती. एकूण पाच अधिकाऱ्यांच्या टीम मार्फत दीपिकाची चौकशी करण्यात येतेय. दीपिकाने Whats App ग्रुपच्या माध्यमातून तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिच्याकडे ड्रग्सची मागणी केलेली. याबाबत दीपिकाला विचारणा करण्यात आली. दीपिकाने त्या WhatsApp चॅट्स बाबत कबुली दिलेली आहे. मात्र आपण ड्रग्स घेतलेले नाहीत असं म्हटलंय.  

काय म्हणाली सारा अली खान 

सुशांत सिंह राजपूत हा आधीपासून म्हणजेच रिया चक्रवर्ती त्याच्या आयुष्यात येण्या आधीपासूनच ड्रग्स घेत होता. अशा आशयाचं स्टेटमेंट सारा अली खान हिने दिलंय. सुशांत सिंह राजपूत आणि तिच्यामधील नात्याबद्दलही तिने खुलासा केलाय. मात्र सारा अली खान हिने स्वतः ड्रग्स सेवन केलंय याचा इन्कार केलाय. 

काय म्हणाली श्रद्धा कपूर  

पवनामध्ये झालेल्या पार्टीत ड्रग्स होतं हे श्रद्धा कपूर ने मान्य केलंय. मात्र मी स्वतः ड्रग्स घेतले नाही, घेत नाही असं श्रद्धा कपूर म्हाणालीये. 

निष्कर्ष काय निघतो ?

श्रद्धा आणि सारा यांच्या स्टेटमेन्टमधून सुशांत सिंह राजपूत हा आधीपासून ड्रग्स घायचा हेच समोर येतंय. रिया देखील सुशांत हा ड्रग्स घेत होता हे आधीच म्हाणालीये. दरम्यान,  आता या दोघींच्या स्टेटमेंटवरून रियावर सुशांतला ड्रग्सची नशा करण्यास भाग पाडलं किंवा रियाने सवय लावल्याने सुशांतने ड्रग्स घेणं सुरु केलं आणि त्या ड्रग्समध्ये त्याने आत्महत्या केली या आरोपांचं वजन कमी होतंय असं म्हंटल तर वावगं ठरू नये. 

statement of deepika sara and shradda in front of narcotic control bureau

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT