मुंबई

नागरिकच नाहीतर गेल्या १३ वर्षांपासून मुंबई महापालिकेत पुतळेही वेटींगवर

समीर सुर्वे

मुंबई: मुंबई महानगर पालिकेत फक्त नागरिकांनाच रांगेत उभे राहावे लागत नाही. आता तर पुतळ्यांनाही वेटींगवर राहावे लागत आहे. महापालिका सभागृहात जागा नसल्याने तब्बल 13 वर्षांपासून पाच पुतळे प्रतिक्षेत आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या मुख्यालयातील सभागृहात देशातील आणि राज्यातील ऐतिहासिक आणि थोर व्यक्तीचे पुतळे अस्तित्त्वात आहे. असे 13 पुतळे अस्तित्त्वात आहेत. मात्र ९०च्या दशकानंतर सभागृहात नवा पुतळा बसविण्यात आलेला नाही. महापालिकेच्या सभागृहातच पुतळ्यांसाठी आज जागाच शिल्लक राहिलेली नाही, असे कारण महापालिका प्रशासन पुढे करत आहे.

महापालिका सभागृहात 247 जणांच्या बसण्याची सोय आहे. नगरसेवकांची संख्या ठराविक वर्षांनी वाढून आता 227 पर्यंत पोहोचली आहे.  पाच स्विकृत नगरसेवकही आहेत. उर्वरीत 15 आसने ही अधिकारी आणि पत्रकारांसाठी वापरले जातात. सध्याच्या परिस्थितीत सभागृहात पुतळे बसवण्यासाठी जागा नाही अशी माहिती महापालिका प्रशासनाने महासभेत मांडली आहे.

भाजपच्या दक्षा पटेल यांनी भारतरत्न दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा सभागृहात बसवण्याची ठरावाची सूचना मांडली होती. सभागृहाने 2018 मध्ये मंजूर केलेल्या ठरावावर प्रशासनाने या महिन्यात कामाकाजात अहवाल सादर केला आहे. महापालिका मुख्यालय उभारण्याचे काम 1884 मध्ये सुरु झाले होते. तेव्हा बांधण्यात आलेले सभागृह आजही नगरसेवकांना पुरेसे आहे. त्याच बरोबर सभागृहात १ प्रेक्षक गॅलरी आणि १ महत्वाच्या व्यक्तीसाठी गॅलरी आहे.

यांचे पुतळे वेटिंगवर

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.वा.शिरवाडकर कुसूमाग्रज, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे, शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे.

तैलचित्रांनाही जागा नाही

सभागृहांच्या भिंतीवर 11 तैलचित्र होती. त्यातील 9 तैलचित्र 2000 साली लागलेल्या आगीत जळाली होती. ती सर्व तैलचित्र आता नव्याने तयार करुन भिंतीवर लावण्यात आली आहे. त्याच बरोबर 2017 मध्ये प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे तैलचित्र बसविण्यात आले आहे. पण 2013 च्या ठरावानुसार मुंबईचे पहिले नगरपाल रघुनाथ नारायण खोटे यांचे छायाचित्र लावण्याची परवानगी मिळालेली नाही. आता तैलचित्र तसबीरीही लावण्यासाठी जागा नसल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

समिती सभागृहांचा विचार करावा

महापालिका सभागृहात पुतळे, तैलचित्रे, तसबीरी बसवण्याची जागा नाही. मात्र स्थायी समिती तसेच समिती सभागृहात बसवण्याबाबत सभागृहाने निर्णय घ्यावा, अशी विनंती प्रशासनाने या अहवालातून केली आहे.

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Statues have been waiting Mumbai Municipal Corporation from last 13 years

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT