strawberry sakal
मुंबई

वाड्यातील गारगावमध्ये पिकली स्ट्राॅबेरी ; शेतकऱ्यांना सहयोग संस्थेकडून मदत

दिलीप पाटील

वाडा : वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. वाडा कोलमला राज्यभरात चांगली मागणी आहे. कोलमला मागणी चांगली असली तरी निसर्गाचा लहरीपणा, यांत्रिक उपकरणे, औषधे, बि-बियाणे, मनुष्यबळाचे वाढलेले दर लक्षात घेता आता भातशेती न परवडणारी झाली आहे. त्यामुळेच वाड्यातील शेतकरी आता भातशेतीनंतर फळशेती, फुलशेती, भाजीपाला शेती, मत्स्यशेती, कुक्कुट पालन आदीकडे वळले आहेत. तालुक्यातील गारगाव येथील शेतकऱ्यांनी चक्क स्ट्राबेरीचे उत्पादन यशस्वीरित्या घेऊन हे पीक वाड्यातही येऊ शकते हे दाखवून दिले आहे.

वाडा तालुक्यातील गारगाव या गावात सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई या संस्थेकडून येथील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी, फळ, फूल व भाजीपाला शेतीसाठी आर्थिक मदतीसह मार्गदर्शन करण्यात येत आहे. या संस्थेच्या सहयोगाने येथील पाच शेतकऱ्यांनी तर चक्क लालचुटूक स्ट्रॉबेरी पिकवली आहे. संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने ही पिके घेतली गेले आहे. रासायनिक औषधांचा लवलेवशही येथे पाहायला मिळत नाही. येथील लक्ष्मण राऊत, हितेश पाटील, किशोर सोनवणे व भाऊ राऊत या शेतकऱ्यांनी स्ट्राबेरीचे उत्पादन घेतले आहे.

शेतकऱ्यांनी आठ ते दहा गुंठे जागेत स्ट्राबेरीचे उत्पादन घेतले असून सर्वप्रथम शेतातील माती भुसभुशीत करून त्यावर सरे बनवले, त्यानंतर मल्चींग करून रोपे लावण्यात आले. ही रोपे उरळीकांचन येथून आणण्यात आली. संपूर्ण ठिबक पद्धतीने ही शेती केली आहे. १ × १ सेंटीमीटरवर लागवड करण्यात आली असून लक्ष्मण राऊत यांनी दोन गुंठे जागेत एक हजार रोपे लावली आहेत. स्ट्राबेरी पीक हे थंडीमध्ये येते, ते मार्चअखेरपर्यंत हे पीक चालणार आहे. येथील वातावरण स्ट्राबेरीला पोषक असल्याने हे पीक चांगले बहरले आहे. यावर रासायनिक खतांचा कोणताही मारा न करता जीवामृत, ब्रह्मास्त्र, अर्क हे वापरण्यात आले आहे.

स्ट्राबेरीपासून जेली व जाम बनवता येते. स्ट्राबेरीचे वैशिष्ट्य गोडपणा, सुगंधी व आंबटपणा, भडक लालसर ही फळे महाबळेश्वरपेक्षाही अधिक चवीला रुचकर आहे.

- लक्ष्मण राऊत, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Female News Anchor Suicide : खळबळजनक! महिला न्यूज अँकरची चॅनलच्या ऑफिसमध्येच गळफास लावून आत्महत्या

Smriti - Palash Wedding: 'स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे...', भाऊ पलाशचं लग्न लांबणीवर पडल्यानंतर पलक मुच्छलची पोस्ट

Sunidhi Chauhan Concert : ‘देसी गर्ल’च्या मैफिलीची उत्सुकता; ‘स्वास्थ्यम्’ मध्ये ६ डिसेंबरला ‘सुनिधी चौहान कॉन्सर्ट’!

Palghar News : मोखाड्यात प्रसुत मातेची बाळाला घेऊन जंगलातुन २ किलोमीटर पायपीट; रूग्णवाहीका चालकाने अर्ध्यावरच सोडल्याने ओढवला प्रसंग!

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT