Aryan Khan Sakal
मुंबई

कठोर शर्ती घाला, पण जामीन द्या; आर्यन खानच्यावतीने विनंती

आज निर्णय शक्य

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : क्रूझवरील अमलीपदार्थ प्रकरणात आरोपी असलेल्या आर्यन खानसह तीन जणांच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद बुधवारी पूर्ण झाला. ‘एनसीबी’ उद्या युक्तिवाद करणार आहे. आर्यन, अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा यांच्यावर कठोर शर्ती घाला; पण त्यांना जामीन मंजूर करा, अशी विनवणी तिघांच्यावतीने केली आली.

ड्रगपुरवठ्याचे कटकारस्थान तिघांनी केले नसून ‘एनसीबी’ बेकायदा आरोप करत आहे, असा युक्तिवाद वकील अमित देसाई यांनी न्या नितीन सांब्रे यांच्या पुढे केला. अटक करताना तपास अधिकाऱ्यांना सबळ पुरावा द्यायला हवा, असे विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी सांगितले. व्हॉट्सॲप चॅट व क्रूझ प्रकरण यांचा संबंध नाही, यासंदर्भात कोणताही मेसेज व्हॉट्सॲपमध्ये नाही व फोन कॉलमध्येही नाही. मग त्यांनी हे कारस्थान आखले, असा दावा करता येत नाही व त्या आधारावर एवढे दिवस कारागृहात ठेवता येत नाही, असा युक्तिवाद देसाई यांनी केला.

आजचा दिवस महत्त्वाचा

‘एनसीबी’च्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह हे गुरुवारी (ता. २८) बाजू मांडणार आहेत. उद्याची (ता. २८) सुनावणी महत्त्वाची असून जर वेळेत युक्तिवाद पूर्ण झाला तर निकाल येण्याची शक्यता आहे. अन्यथा शुक्रवारी (ता. २९) यावर निर्णय लागू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Keir Starmer: मोठी बातमी! अखेर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा राजीनामा; नव्या PM च्या शर्यतीत मोठं नाव आघाडीवर

Konkan Railway : कोकणवासीयांवर अन्याय! दादर-रत्नागिरी पॅसेंजरबाबत रेल्वेमंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली; रेल्वे प्रशासनाचा मनमानी कारभार

Latest Marathi News Live Update : कासारवाडीजवळ पीएमपीने तीन ते चार गाड्यांना उडवले

Fifa World Cup 2026 : यमाल दे धमाल! स्पेनच्या Lamine Yamal ने इतिहास घडविला; पेले यांच्यानंतर तोच... मेस्सीचाही विक्रम मोडला

Sangli Rain Update : किती मिलिमीटर पाऊस पडल्यावर करावी खरीप पेरणी? हंगामातील पेरणीचे 15 दिवस वाया, शेतकऱ्यांच्या हातात अजून किती दिवस शिल्लक?

SCROLL FOR NEXT