Deharje Project sakal media
मुंबई

विक्रमगड : देहर्जे प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन

अमोल सांबरे

विक्रमगड : विक्रमगड (vikramgad) तालुक्यातील बहुचर्चित देहर्जे प्रकल्पबाधितांनी (Deharje project victims) पुनर्वसन व भुसंपादनासाठी मागील पाच वर्षांपासून शासनाचे उंबरडे झिजवले आहेत. प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम युद्धपातळीवर सुरू असतानाही आपल्या मागण्यांकडे शासन कानाडोळा (Maharashtra Government) करीत असल्याचा आरोप करीत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत प्रकल्पाचे काम चालू देणार नाही, असा निर्धार बाधितांनी केला आहे.

देहर्जे हा प्रकल्प विक्रमगड तालुक्यातील साखरे गावाच्या परिसरात सुरू असून 95 दशलक्ष घन मीटर पाणीसाठा असलेल्या या धरणात वनविभागाची 445 हेक्टर तर 238 हेक्टर खाजगी लाभार्थ्यांची जमीन पाण्याखाली जाणार आहे. 2003 साली या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून 2018 साली प्रत्यक्ष खोदकाम सुरू करण्यात आले. प्रकल्पात साखरे, खुडेद, जांभा या गावांसह अनेक पाड्यातील जवळपास 402 कुटुंब बाधित असून 1443 कोटी रुपये या प्रकल्पाला खर्च होणार आहेत.

deharje project victims

धरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून बाधित कुटुंबीयांना अजूनही जमिनीचा मोबदला व पुनर्वसन याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मंगळवारी धरणाच्या बांधाजवळ देहर्जे प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलन उभारण्यात आले. आधी पुनर्वसन, मगच धरण असा नारा संघर्ष समितीने दिला असून मागण्या मान्य होई पर्यंत धरणाचे काम सुरू होऊ देणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

यावेळी देहर्जे धरण बाधित प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. तसेच जिल्हा परिषद सदस्य संदेश ढोणे आंदोलनात सहभागी होते. पालघर जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, विक्रमगड नगरपंचायतचे माजी उपनगरध्यक्ष निलेश पडवळे यांनी या आंदोलकांना भेटून पाठिंबा दर्शवला. तर जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश शेवाळे यांनी आंदोलकाना भेटून समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु जो पर्यत सर्व प्रकल्पाग्रस्ताचे सर्व प्रश्न सुटणार नाही तो पर्यत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तानी सुरु ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagarpalika Election Date: या तारखेला नगरपालिकेची झुंज! स्थानिक स्वराज्यच्या पहिल्या टप्प्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, Time Table बघा अन् लागा तयारीला...

Duplicate Voters List : दुबार मतदाराच्या नावापुढे डबल स्टार, नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आयोगाने उचलले मोठे पाऊल, कशी घेणार दक्षता ?

Latest Marathi News Live Update : शेतकरी व्यापाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत होणार 'या' अभिनेत्याची एंट्री; प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षकांनीच सांगितलं नाव

Ganesh Naik : १५०० बिबट वनतारामध्ये स्थलांतरित व १००० पिंजरे खरेदीसाठी १० कोटी रुपये निधी मंजूर करण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT