मुंबई

TY च्या परीक्षेबाबत मुख्यमंत्री आणि राज्यपालांचं तर ऐकलं, पण विद्यार्थी काय म्हणतायत, वाचा...

सुस्मिता वडतिले

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार निर्णय घेण्यात येईल, असे कळविले आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द झाल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागलेल्या दिसून येत आहेत. पदवी-पदव्युत्तरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दिलासा तसेच नाराजीचे आणि संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे. अशावेळी एक ना अनेक चिंता विद्यार्थ्यांना सतावत आहेत. परीक्षा होणार आहेत की नाही. विद्यार्थ्यांमध्ये याबाबतीत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. परीक्षेसंदर्भात घेतलेल्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे काय मत आहे. त्यावर 'सकाळ'ने त्यांच्याशी साधलेला संवाद .

यावेळी गणेश सोनवणे म्हणाले, आपले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अंतिम परिक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय सद्यस्थितीस योग्य आहे. परंतु या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक हितावर बाधा येईल का?  याचा विचार शासनाने सकारात्मकपणे शासनाने केला पाहिजे. 

शुभम चवरे म्हणाले, अंतिम वर्षातील विद्यार्थ्याच्या परीक्षा न घेण्याचा  योग्य आहे. सर्वांसोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न समोर उभा आहे. सरकारने हा निर्णय घेताना योग्य ती कायदेशीर कारवाई पूर्ण केली आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे. कारण जर उद्या भविष्यात नोकरीसाठी निघालेले अर्ज असतात. त्यात जर सन २०२० चा विद्यार्थी पदवीधर असलेल्यांनी अर्ज करू नये, असे नियम केले तर त्याचा मोठा तोटा सहन करावा लागू शकतो.

यावेळी भाग्यश्री बिराजदार म्हणाल्या,  करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता सरकारने अंतिम वर्षातील परिक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. परंतु सर्व परीक्षा  रद्द न करता काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यास हरकत नाही. मुख्यमंत्र्यांचा निर्णय योग्य असल्याने ग्रामीण भागातील आणि लांब राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या तरी परिक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेतल्यातरीही अडचणी निर्माण होणार आहेत. 

यावेळी विनया कांबळे म्हणाल्या की, विद्यार्थ्याच्या परीक्षा होणं महत्त्वाचं आहे. परंतु सद्यस्थिती पाहता ते अशक्य आहे. ऑनलाईन परीक्षा देणं शक्य नाही. कारण मोबाईल नेटवर्क समस्या खुप आहेत. त्यामुळे अनेक अडचणी येणार आहेत आणि अशावेळी विद्यार्थ्यांच्या मनस्थितीचा विचार केला पाहिजे. एकदा परीक्षा घेतली जाणार नाही, हे सांगून परत परीक्षा घेतली जाईल. हे काय चाललंय नक्की आम्हाला समजेल का? यामुळे आम्ही संभ्रमात पडलो आहोत.  अशावेळी विद्यार्थ्यांच्या मताचाही विचार करा. सरकारने योग्य तो निर्णय लवकर द्यावा. आम्ही या आधी तीनही सेमिस्टरच्या परीक्षा दिलेल्या आहेत. आमचं भविष्य धोक्यात येवू नये याचा विचार केला पाहिजे. 

यावेळी शाहबाज शेख म्हणाले की, अंतिम वर्षातील विद्यार्थी पंधरा-सतरा वर्षापासून पेपर देत आहेत. त्यांना मागील सेमिस्टरच्या सरासरीवरून गुण देता येऊ शकतात. मात्र परीक्षा घेतल्यात आणि त्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला तर याची जबाबदारी कोण घेणार? विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरच करोना झाला आणि तो मरण पावला तर त्याच्या आई-वडिलांवर काय परिणाम होतील. आपले पालक मुलांना इतकं शिकवून मग अशा शिक्षणाचा काय उपयोग?  या गोष्टींकडे गांर्भीयाने पाहिले पाहिजे.

यावेळी शुभम कांबळे म्हणाले की, शासनाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घ्यायला पाहिजेत. कारण आता सरकारने परीक्षा न घेता अंतिम वर्षात आम्हाला प्रमोट करून पास केले तर उद्या नक्कीच आमच्या भवितव्यावर परिणाम होईल असे आम्हाला वाटत आहे.

students are totally confused about their final year exams read what they think about current chaos

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: आचारसंहितेच्या काळातही लाडक्या बहीणींना हप्ता मिळणार, पण... १८ नोव्हेंबरची मुदत संपली तर लाभ थांबणार!

Jana Gana Mana Controversy : 'जन गण मन' हे ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी रचलेले गीत; भाजप खासदाराच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ

Latest Marathi News Live Update : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई

Shocking News : मालकिणीचे कामगारावर जडले प्रेम, लग्नानंतर पती पैसे घेऊन फरार; महिलेने पोलिस ठाण्यात उचलले टोकाचे पाऊल

Bribery Action : 'साताऱ्यात लाचप्रकरणी लिपिक जाळ्यात'; शेळी पालनासाठी कर्ज मंजुरीसाठी मागितले पैसे, जिल्ह्यात खळबळ

SCROLL FOR NEXT