मुंबई

'आयसीएसई'च्या परिक्षा रद्द करण्यासाठी विद्यार्थी थेट न्यायालयात; राज्य सरकारचाही मागणीला पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यभरात होणाऱ्या आयसीएसई परिक्षेच्या विरोधात आता विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. दरम्यान आयसीएसई परिक्षा घेण्याला राज्य सरकारच्या वतीने विरोध करण्यात आला असून सध्याच्या गंभीर परिस्थितीत परिक्षा घेणे योग्य नाही, अशी भूमिका राज्य सरकारने स्पष्ट केली आहे.

येत्या 2 ते 12 जुलै दरम्यान आयसीएसई मंडळाच्या दहावी आणि बारावी परिक्षा निर्धारित करण्यात आल्या आहेत. या परीक्षांविरोधात विद्यार्थ्यांनीच न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोरोनाचा विळखा सर्वत्र पसरत असताना परीक्षा का घेण्यात येत आहे, जेव्हा कोरोनाचा प्रारंभ मार्चमध्ये झाला तेव्हा मंडळाने परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. मग आता जेव्हा रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, तेव्हा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बाहेर बोलविणे योग्य नाही, असे याचिकदारांचे म्हणणे आहे. शिवाय सरकारी कर्मचाऱ्यांसह मंत्रीही घरूनच काम करीत आहेत, असेही याचिकेत म्हटले आहे.

परिक्षांवर सरकारचे नियंत्रण नाही
सध्याच्या गंभीर परिस्थितीत परिक्षा घेणे योग्य नाही, अशी भूमिका राज्य सरकारने स्पष्ट केली असून त्याबाबत महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी शुक्रवारी न्यायालयात बाजू मांडली. मात्र या परिक्षेवर सरकारी नियंत्रण नसते, हे स्पष्ट करत याबाबत मंडळाला कळविल्याचेही त्यांनी सांगितले.

पुढील आठवड्यात सुनावणी
राज्य सरकारने अनेक परीक्षा रद्द केल्या आहेत. मग अन्य विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालू नये, अशी मागणी याचिकेत केली आहे. याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT