अंतराळ तंत्रज्ञानाबाबत कल्याणच्या विद्यार्थ्यांचा 'नासा'च्या शास्त्रज्ञांशी संवाद!
अंतराळ तंत्रज्ञानाबाबत कल्याणच्या विद्यार्थ्यांचा 'नासा'च्या शास्त्रज्ञांशी संवाद! 
मुंबई

अंतराळ तंत्रज्ञानाबाबत कल्याणच्या विद्यार्थ्यांचा 'नासा'च्या शास्त्रज्ञांशी संवाद!

रविंद्र खरात

कल्याण : अमेरिकेच्या जगप्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्था 'नासा'तील शास्त्रज्ञाने कल्याणच्या केम्ब्रिआ शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला . नासामधील वरिष्ठ शास्त्रज्ञ जॉर्ज सालझार यांनी स्पेस टेक्नॉलॉजी (अंतराळ तंत्रज्ञान) या अत्यंत किचकट विषयाचे विविध पैलू अत्यंत सोप्या शब्दांत विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवले. 

शालेय शिक्षणाबरोबरच पुस्तकबाह्य शिक्षणासाठी कल्याणातील केम्ब्रिआ इंटरनॅशनल ही शाळा सुप्रसिद्ध आहे. त्याचाच एक भाग म्हणून जगातील अंतराळ क्षेत्रातील अग्रगण्य संस्था 'नासा'तील (नॅशनल एअरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनीस्ट्रेशन) शास्त्रज्ञाचे वेबिनारद्वारे मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान आणि अभियांत्रिकी या दोन्हींमध्ये एक पुसटशी रेषा आहे. विज्ञानाद्वारे आपल्याला निसर्ग समजून घेण्यासाठी मोठी मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतत प्रश्न उपस्थित करणे आवश्यक असल्याचे  जॉर्ज सालझार यांनी सांगितले. तब्बल 2 तास चाललेल्या या कार्यक्रमात जॉर्ज सालझार यांनी स्पेस टेक्नॉलॉजी, त्यामधील सायन्स-गणित आणि खगोलशास्त्र विषयांचे अनन्यसाधारण महत्व, अंतराळ मोहीमेसाठी केली जाणारी पूर्व तयारी, अभ्यास, ठोकताळे, अमेरिकेची चंद्रावरची ऐतिहासिक अपोलो मोहीम, पूर्वीचे आणि आताचे अंतराळ तंत्रज्ञान, कम्युनिकेशन सिस्टीम, सूर्यमाला, हबल दुर्बिण, सूर्यमाला यांसारख्या अनेक महत्वपूर्ण आणि छोट्या छोट्या गोष्टीची सोप्या शब्दांत विद्यार्थ्यांना माहिती दिली.

 
या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनीही सालझार यांना अंतराळ, ब्लॅक होल्स, टाईम मशिन्स, मंगळ ग्रह, पृथ्वीवरील आणि अंतराळातील वेळांमध्ये असणारा फरक, रॉकेट तंत्रज्ञान, गुरुत्वाकर्षणाचा शरिरावर होणारा परिणाम यांसारखे अनेक प्रश्न विचारत अंतराळाबद्दल त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या कुतुहलाला वाट मोकळी करून दिली. मुलांना प्रश्न पडावेत हाच या कार्यक्रमाच्या आयोजनामागचा मुख्य हेतू होता अशी माहिती पोटे समुहाचे सीएमडी आणि केम्ब्रिआ शाळेचे मुख्य बिपीन पोटे यांनी दिली. मुलांना चांगले प्रश्न पडले की त्याची उत्तरंही चांगलीच मिळतात. 'कुतूहल ही ज्ञानार्जनाची जननी' असल्याचे बोलले जाते आणि आम्ही यालाच प्रमाण मानून विद्यार्थ्यांसाठी असे वेगवेगळे उपक्रम राबवत असल्याचेही बिपीन पोटे यांनी यावेळी स्पष्ट केले.
----------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : देशात सकाळी 11 वाजेपर्यंत 25.41 टक्के मतदानाची नोंद; महाराष्ट्रात 18.18 टक्के मतदान

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

SCROLL FOR NEXT