students aandolan 
मुंबई

अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्यासाठी विद्यार्थी संघटनेनं केलं आंदोलन; राज्यपालांच्या भूमिकेचा केला निषेध

सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या अंतिम सत्राची परीक्षा राज्य सरकारने रद्द केली आहे. यानंतरही राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा घेण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे. या भूमिकेचा विद्यार्थी भारती संघटनेने  कल्याण पूर्वेकडील बापगाव येथे फिजिकल डिस्टनसिंग पाळत काळे मास्क घालून केला निषेध व्यक्त केला.

राज्यातील अंतिम सत्राच्या परीक्षेवरून राजकारण रंगले आहे. या गोंधळात विद्यार्थी आणि पालक संभ्रमात पडले आहेत. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने परीक्षा घेणे विद्यापीठांसमोर एक आव्हान निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव परीक्षा रद्द करून मागील परीक्षांच्या आधारे गुणदान करण्याचा तसेच ज्यांना परीक्षा द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल, असे सरकारने जाहीर केले आहे. हा निर्णय विद्यार्थी हिताचा असल्याने राज्यपालांनी केवळ राजकारणासाठी सरकारविरोधी भूमिका घेऊ नये, असे आवाहन यावेळी विद्यार्थी भारती संघटनेकडून करण्यात आले.

पंतप्रधानांनी वटहुकूम काढून भारतातील सर्वच राज्यातील अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द कराव्यात.  परीक्षा रद्द न झाल्यास विद्यार्थी भारती झोपमोड आंदोलन करेल, असा इशारा विद्यार्थी भारती राज्यद्याक्षा मंजिरी धुरी यांनी दिला आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षांवर राजकारण नको:
अंतिम वर्षाच्या परीक्षांचे राजकारण अत्यंत निंदनीय आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती व अनिश्चितता निर्माण झाली आहे, असे स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाने (एसआयओ)  राज्यपाल आणि राज्य सरकारला लिहिलेल्या एका पत्रात म्हंटले आहे. विद्यापीठाच्या परीक्षांच्या विषयावर पक्षपात करण्याऐवजी सर्वसहमतीने निर्णय घेण्याची गरज संघटनेने व्यक्त केली आहे.

students union protest for cancelling last year exam read full story  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Resignation : क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब? अजित पवार–फडणवीस भेटीने खळबळ

Chandrashekhar Bawankule: नागपूरसह राज्यात महायुती मजबूत : चंद्रशेखर बावनकुळे; ५१ टक्क्यांहून अधिक मतांसह महायुती सत्तेत येईल!

Latest Marathi News Live Update : IIT मुंबईचा वार्षिक कार्यक्रम मूड इंडिगो रद्द

कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात! गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा कायम, आज अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता

Ketu Gochar 2026: जानेवारीत केतुची कृपा! ‘या’ राशीच्या लोकांसाठी सुरू होणार सुवर्णकाळ

SCROLL FOR NEXT