मुंबई

विद्यार्थी सहामहिने आधीच होणार CA, दहावीनंतर लगेच प्रवेशासाठी करता येणार नोंदणी

तेजस वाघमारे

मुंबई : विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळावा यासह संस्थेशी जोडले गेल्यावर त्यांच्यात व्यावसायिक कौशल्य विकसित व्हावीत या उद्देशाने इन्स्टिट्यूट ऑफ चाटर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) प्रवेश नोंदणीमध्ये महत्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना आता दहावीनंतर सीएसाठी नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आता सहा महिने अगोदर सीए होऊ शकतील.

CA करणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वी बारावीत गेल्यावर सीए साठी नोंदणी करता येत होती. मात्र आता दहावीनंतर नोंदणी करता येईल. यासाठी आयसीएआय संस्थेच्या कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. दहावीत प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांना फाउंडेशनची तयारी करण्यासाठी वेळ मिळणार आहे.

यानंतर ते बारावीनंतर फाउंडेशनची परीक्षा देऊ शकतात. त्यांचे प्रवेश बारावी उत्तीर्ण झाल्यानंतरच निश्चित केले जाणार आहेत. दहावीत नोंदणी केल्यामुळे अकरावी आणि बारावीचा अभ्यास करत असताना त्यांचे ज्ञान अधिक वृद्धींगत होण्यास मदत होणार आहे. याचबरोबर फाउंडेशनच्या परीक्षेला कसे सामोरे जायचे याचा आत्मविश्वासही निर्माण होणार आहे.

बारावी परीक्षेस पात्र झाल्यानंतर मे किंवा जून महिन्यात होणाऱ्या फाउंडेशन परीक्षेस हे विद्यार्थी पात्र ठरतील. फाउंडेशनची परीक्षा देण्यापूर्वी आवश्यक असलेला चार महिन्यांचा अध्ययन कालावधी हे विद्यार्थी अकरावी व बारावी या दोन वर्षांत त्यांच्या सोयीने पूर्ण करू शकतात. तसेच या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना सहा महिने लवकर सीए पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.

( संपादन - सुमित बागुल )

Students will be able to register for admission in CA immediately after 10th

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Advisory : 'कॉक्रोच जनता पार्टी'चा आज मोर्चा! पुण्यात वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना अखेर दिलासा! आज सोन्याच्या भावात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Krishnaraj Mahadik Rahul Gandhi : 'राहुल गांधींना जराही समज नाही, संसदेत आवाज उठवा, रस्त्यावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरू नये'; कृष्णराज महाडिकांची टीका

Bombay High Court Alimony Ruling : पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा जास्त तर पोटगी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतली, तरी हे आंदोलन थांबणार नाही; संजय राऊत यांचा मोदी सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT