मुंबई

कोरोनातून बरे होण्यासाठी 55 दिवस ICUमध्ये राहिलेल्या व्यक्तीवर यशस्वी उपचार

भाग्यश्री भुवड

मुंबईः तब्बल दोन महिने कोरोनासह इतर आजारांनी त्रस्त असलेल्या 46 वर्षीय व्यक्तीवर यशस्वी उपचार करुन त्याला पुन्हा जीवदान देण्यात मुंबईतील डॉक्टरांना यश आलं आहे.

जतिन संघवी या 46  वर्षीय ही व्यक्ती अत्‍यंत लठ्ठ होती. सोबत उच्‍च रक्‍तदाब, दमा आणि स्‍लीप एपनियाचा त्रास होता. ज्‍यामुळे उपचार करणे अत्‍यंत अवघड झाले. तो 15 ऑक्‍टोबर या दिवशी भाटिया रुग्णालयात दाखल झाल्यापासून 55 दिवस आयसीयूमध्‍ये होता. एका क्षणाला डॉक्‍टरांनी विषाणूपासून त्‍याला वाचवण्‍याची आशा सोडून दिली होती. त्‍याच्‍या शरीरामध्‍ये पाणी जमा झाले होते. त्याच्या वाढलेल्या वजनामुळे इतर तपासण्या करणेही कठीण जात होते.

या रुग्णाविषयी अधिक माहिती देताना डॉ. मनिष मवानी यांनी सांगितले की, या रुग्णावर सहज उपचार करता येणार नव्हते. वाढलेल्या वजनामुळे त्‍याच्‍या सीटीस्कॅनही योग्यरित्या करता आले नाही. त्याची तपासणी केली तेव्हा ऑक्सिजनची पातळी खालावली होती. त्‍याला 50 दिवस नॉन-इन्‍वेसिव्‍ह व्‍हेंटिलेटरवर ठेवण्‍यात आले. त्‍याला बेडवरून हलवणे देखील अवघड होते. हालचाल न झाल्‍यामुळे तो एकाच ठिकाणी खिळून बसेल. आम्‍ही फुफ्फुसाचे नुकसान कमी करण्‍यासाठी त्‍याला विशेष अॅण्‍टी-फायब्रोटिक औषधे देण्‍यास सुरूवात केली आणि त्‍याला 10 दिवस रेमडेसिवर देण्‍यात आले, तसेच प्‍लाझ्मा ही चढवण्यात आला.

संघवी यांना कोविडच्‍या लक्षणांमधून पूर्णपणे बरे होण्‍यासाठी औषधोपचार आणि फिजियोथेरपी सुरू ठेवावी लागणार आहे. त्‍याचे 20 किग्रॅ वजन कमी झाल्‍यामुळे ते खूप आनंद झाला आहे. तसेच घरी त्‍याच्‍या कुटुंबासोबत नववर्ष स्‍वागताचा आनंद घेता येणार असल्‍यामुळे देखील त्‍यांना खूप आनंद झाला आहे. 

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Successful treatment person stays in ICU for 55 days to recover from corona

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake Cancer Medicines Racket : कॅन्सरच्या बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघड; ९० हून अधिक रुग्णालयांना पुरवठ्याचा संशय

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर शिवेंद्रसिंहराजेंचा मोठा दावा; ‘तोंडाला पाने पुसणारे नव्हे, न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार’

Kundan Sankhe Arrested : पालघर रिलीफ रुग्णालय राडा प्रकरण; निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुखासह आठ जणांची पोलिसांसमोर शरणागती, राहुल घरतसह 22 जणांना पोलिस कोठडी

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती आगमन मिरवणुकीला सुरुवात

लालबागचा राजाचं दर्शन घ्यायचंय? जाणून घ्या पूजा आणि आरतीची वेळ, पाहा LIVE VIDEO

SCROLL FOR NEXT