नेरुळमधील एकाची नैराश्‍येतून आत्महत्या
नेरुळमधील एकाची नैराश्‍येतून आत्महत्या 
मुंबई

नेरुळमधील एकाची नैराश्‍येतून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : नेरुळ सेक्‍टर-१८ मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. धनंजय गलांड (३७) असे या व्यक्तीचे नाव असून, त्याने आर्थिक अडचणीमुळे आलेल्या नैराश्‍येतून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

मृत धनंजय गलांड हा नेरुळ सेक्‍टर-१८ एमध्ये कुटुंबासह राहण्यास होता. गत आठवड्यात धनंजय हा पत्नीसह नातेवाईकाच्या लग्नासाठी गेला होता. त्यानंतर धनंजयची पत्नी कामानिमित्त काही दिवसांसाठी गावीच राहिल्याने तो एकटाच नवी मुंबईत परतला होता. त्याचा मेव्हणा शेजारीच राहण्यास असल्याने तो त्याच्यासोबत कधीतरी घरी राहत होता. मात्र, शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास धनंजय याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या मेव्हण्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता, आतून धनंजयकडून काहीच प्रतिसाद न आल्याने त्याने खिडकी उघडून पाहिले असता, धनंजयने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यामुळे धनंजयला तत्काळ वाशी येथील पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. धनंजय हा काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीत सापडला होता. त्यामुळे आलेल्या नैराश्‍येतून त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार नेरुळ पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून, पुढील तपासाला सुरुवात केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT