Maratha Reservation sakal
मुंबई

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या तरुणाची आत्महत्या; राजकीय वाद पेटण्याची शक्यता

मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. सुनील कावळे 45 वर्ष अस आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली आहे.

आत्महत्या करणारा हा तरुण मुळाचा अंबड तालुक्यातील असून त्याचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी केलेल्या केलेल्या या आत्महत्येमुळे आता राज्यात राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

सुनील कावळे जालन्याचे रहिवाशी होते. त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडली आहे. या नोटमध्ये त्यांनी सर्वांची माफी देखील मागितली आहे. मध्यरात्री त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर येत आहे

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचा दावा विनोद पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. आत्महत्या करणारी व्यक्ती ही मूळची अंबड तालुक्यातील असून त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

काही दिवसांपुर्वी मराठा आरक्षणासाठी तरुणाने केली होती आत्महत्या

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण असतानाच धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील माडज येथील एका मराठा तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी गावातील शिवकालीन वैजनाथ महाराज तलावात उडी घेऊन आत्महत्या केली होती.

महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिलं पाहिजे यासाठी मनोज जरांगे यांनी लढा उभारला आहे. त्यांना राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. सरकारला आरक्षणावर विचार करून कृती करण्यासाठी दिलेली मुदत संपत आली आहे, सरकार कोणता निर्णय घेणार याकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT