Uddhav Thackeray and Rajnikant Sakal
मुंबई

थलायवा रजनीकांत पोहोचले मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंची घेतली भेट

यापूर्वी रजनीकांत यांनी अनेकदा बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली होती.

सकाळ डिजिटल टीम

सुपरस्टार रजनीकांत सध्या मुंबईमध्ये आहेत. काल वानखेडे स्टेडिअममध्ये बसून मॅच पाहिल्यानंतर आता रजनीकांत मातोश्रीवर पोहोचले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंची भेटही घेतली आहे.

सुपरस्टार थलायवा अभिनेता रजनीकांत उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आले आहेत. ही कोणतीही राजकीय भेट नाही. तर रजनीकांत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चाहते आहेत, त्यामुळे ते मातोश्रीवर आले आहेत. रजनीकांत यांचे ठाकरे कुटुंबीयांशी कौटुंबिक नातेसंबंध आहेत. त्यामुळे ही भेट होत आहे.

सुपरस्टार रजनीकांत मुंबईतल्या वानखेडे स्टेडिअममध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही मॅच पाहायला आले होते. बीसीसीआयकडून त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांनी त्यांचं स्वागतही केलं.

अमोल काळे यांच्या मते, रजनीकांत यांच्या उपस्थितीमुळे भारतीय खेळाडूंचं मनोबल वाढेल. कारण संघामधले अनेक खेळाडू त्यांचे चाहते आहेत. तसंच प्रेक्षकांमध्येही उत्साहाचं वातावरण निर्माण होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune D-Mart: डी-मार्टमध्ये FDA ची मोठी कारवाई! ५० लाखांचे खाद्यतेल जप्त; ९ नमुन्यांचा अहवाल येणार

GTA 6 भारतात लॉंच! तब्बल 13 वर्षांनंतर Vice City ची सफर; 212GB साइज, 2 नवीन पात्रे अन् बरंच काही...कसा कराल डाउनलोड?

Marathi News Live Updates : बिहारच्या बेगुसरायमध्ये काँग्रेस नेते गौरव कुमार यांच्या गाडीवर भरदिवसा गोळीबार

Radhanagari Bus:‘ती’ निघाली पंढरपूरला; पण पोहोचली पुण्याला ;राधानगरी-पंढरपूर बसचा कोल्हापुरातून मार्ग बदलला; प्रवासी अचंबित

पालघरमध्ये शिवसेनेसह राष्ट्रवादीला खिंडार, शिंदेंच्या माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT