मुंबई

पश्चिम महाराष्ट्राच्या उसाला रायगड जिल्ह्याचा आधार 

सकाळ वृत्तसेवा

रोह : कौलारू घरांसाठी मुख्य आधार असतो तो भेंडी झाडाच्या वाशांचा. त्यामुळे एकेकाळी रायगड जिल्हा यासाठी मुख्य बाजारपेठ होती. मुंबईसह अनेक लहान-मोठ्या शहरात जिल्ह्यातून वासे पाठवण्यात येत होते. आता कौलरू घरे कमी झाली आहेत. त्यामुळे या व्यापारावर परिणाम झाला असला नगर, शिर्डी, पुणे जिल्ह्यातून ऊसवाहतूक करणाऱ्या ट्रॉलींना 
आधार देण्यासाठी चांगली मागणी असल्याने या व्यवसायाला आधार मिळाला आहे.

भारी बातमी : सिंहगडापासून शिवरायांचा जयघाेष 
जिल्ह्याचे मुख्य पीक भात असले, तरी पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी भाजीपाल्यासह वृक्षलागवड करत आहेत. यापैकी भेंडी हे महत्त्वाचे उत्पादन आहे. पूर्वी घराच्या कौलांना आधार देण्यासाठी तिच्या वाशांचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येत होता. आता कौलारू घरेच नामशेष होत चालली असल्याने या कारणासाठी वाशांची मागणी घटली आहे. या परिस्थितीत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टर ट्रॉलीच्या दांडीसाठी वाशांची मागणी वाढली आहे. 
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वी जिल्ह्यातून वार्षिक ७० ते ८० हजार भेंडी वासे विकले जात होते. आता त्यामध्ये मोठी घट झाली आहे. ५ वर्षांपूर्वी २९ ते२५ फूट लांबीच्या भेंडी वाशांची घाऊक किंमत ५० ते ६० रुपये होती. आता ९० ते १००  रुपये प्रति नग आहे.
शेतकऱ्याला पूर्वी ३० ते ४० रुपये प्रति वाशाला भाव मिळत होता. आता ७० ते ८० रुपये मिळत आहे, अशी माहिती व्यापारी विष्णू सुर्वे यांनी दिली. मागणी घटली असली तरी उत्पादनातसुद्धा घट झाल्याने भाववाढ झाल्याचे व्यापारी सांगतात. जिल्ह्यातील भेंडी वाशांचा व्यापारातील उलाढाल २० ते २५ लाख रुपये आहे. 
पूर्वी मुंबई, पुणे आणि खारेपाट परिसरात कौलारू घरांचे प्रमाण मोठे होते. त्यामुळे रायगड जिल्ह्यातून या परिसरात भेंडी वाशांची विक्री होत असे. परतीच्या फेऱ्यात जुनी मंगलोरी कौले आणत होते, अशी आठवण व्यापारी सांगतात. 
वाशाला पाणी न लागल्यास तो २० ते २५ वर्षे सहज टिकतो. बैलाच्या धुरीसाठी वापरलेला वासा २ ते ३ वर्षे टिकतो; तर ट्रॉलीची दांडी म्हणून वापरलेला वासा १ वर्ष टिकाव धरतो. भेंडीचे झाड एकदा लावले की दर वर्षी ते उत्पादन मिळते. विशेष लक्ष देण्याची गरज नसते. त्याला फक्त वणव्यापासून जपावे लागते. कोणत्याही प्रकारच्या जमिनीत फांदीपासून झाड तयार होते. 

कौलारू घरे कमी झाली आहेत. त्यामुळे वाशांची मागणी घटली. मात्र बैलगाडी, ट्रॅक्‍टर ट्रॉलीत उसाला आधार देण्यासाठी मागणी आहे. 
- रामदास सरफळे, व्यापारी 

शेतकऱ्यांना पूरक उत्पादन म्हणून भेंडी वाशांचा आधार असतो. मात्र मागणी कमी झाल्याने लागवड कमी होत आहे.
- शांताराम कटे, शेतकरी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Dispute : 'तृणमूल'च्या नाव-चिन्हाचा वाद; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश, निवडणूक आयोगाला ४ महिन्यांची मुदत

Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

अंबरनाथ, बदलापूरवर पाणीकपातीचे संकट गडद; उल्हास नदी सर्वाधिक गढूळ, ३७० 'एनटीयू'वर प्रमाण

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीर विधानसभेत राज्याचा दर्जा बहाल करण्याचा ठराव बहुमताने मंजूर; भाजपचा सभात्याग

School Safety: सीसीटीव्हीविना विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर; हिंगोली जिल्ह्यातील अनेक सरकारी, खासगी शाळा सुरक्षेच्या ‘नजरे’बाहेर, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT