मुंबई

सुशांतसिंह चौकशी प्रकऱण: रिया चक्रवर्तीच्या खाजगी स्वातंत्र्याचा प्रश्न ऐरणीवर

विनोद राऊत

मुबई ; सुशांतसिह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीत प्रसार माध्यमांनी काही दिवसापासून रिया आणि तिच्या कुटुंबियांना अक्षरश: घेरले आहेत. माध्यमांच्या कॅमेऱ्यामुळे त्यांना घरातून पडणे कठिण झाले. रविवारी चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात आलेल्या रियाला चारही बाजूने माध्यमांनी घेरल्याचे चित्र होते. या गर्दीतून, रेटारेटीतून रिया कशीबशी कार्यालयात पोहोचली. या निमीत्ताने एक महिला म्हणून रियाच्या सुरक्षेचा आणि तिच्या खाजगी स्वातंत्र्याच्या अधिकाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

रविवारी माध्यमांच्या प्रतिनीधीच्या गर्दीतून रियाला बाहेर काढण्यात पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. अंगावर काटा आणणारी ही दृष्य़े होती. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी यावर प्रतिक्रीया व्यक्त करत प्रसार माध्यमांना आपल्या तत्वांचा विसर पडल्याची टिका केली. तर जेष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी रिया मध्ययुगीन काळातील क्रूर, पाठलागाची शिकार ठरली आहे. टिव्ही माध्यमांचा एक मोठा वर्ग या जमावाचा एक भाग झाला आहे. हे खेदनजक आहे. हा जमाव पुढे रियाला जिंवत जाळतील, देश म्हणून आम्हाला याची लाच वाटायला पाहीजे.अस प्रतिक्रीया त्यांनी ट्विट करुन दिली.

कायद्याच्या भाषेत सांगायचे झाल्यास आरोपी असो की संशयीत त्यांच्या खाजगीपणाच्या अधिकाराचा सन्मान ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे रिया प्रकरणात माध्यमांनी थोडी सबुरीची भूमिका घेतली पाहीजे. अन्यथा न्यायालयाने याची दखल घेऊन योग्य दिशा निर्देश द्यायला हवे. मात्र त्यासाठी कुणी तरी न्यायालयात जायला हवे असं, निवृत्त न्यायाधीश व्ही पी पाटील यांनी म्हटलय. दुसरीकडे रियाला सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. अस मत व्यक्त केलंय  कायदेतज्ञ आणि मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाचे माजी प्रमुख  सुरेश माने यांनी. मुंबई पोलिसांनी रियाची सुरक्षिततेची काळजी घ्यायला पाहीजे. मात्र ज्या व्यक्तीचा वैयक्तीक स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेतला आहे. त्यांनीदेखील न्यायालयाकडे याची तक्रार करायला हवे,असही त्यांनी सुचवलंय.या प्रकऱणी रिया किंवा त्यांचे वडील न्यायालयात गेले नाहीत. 

एनसीबी कार्यालयात प्रवेश करतांना रियाला जो त्रास झाला, त्याबद्दल एनसीबी अधिकाऱ्यांना जाणीव आहे. रियाला चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती मुंबई पोलिसांना दिली गेली होती.वरीष्ठ अधिकारी या संदर्भात मुंबई पोलिसांशी बोलून रियाच्या सुरक्षेचे योग्य ते उपाययोजना करतील अस एनसीबीच्या सुत्रानी सांगीतले 
गेल्या काही दिवसापासून रियाचा या प्रकारे पाठलाग केला जातो. हे पोलिसांना माहिती असूनही रियाला या गर्दीपासून दूर ठेवण्याची जबाबदारी मुंबई पोलिसांची होती. मात्र पोलिसांच्या  अशा वागण्यामुळे पोलिस राजकीय दबावाखाली येत असल्याचा संशय प्राप्त होतो.अशा प्रसंगी एका महिलेचे संरक्षण करण्यास पोलिस हतबल ठरत असेल,  तर रियाने थेट हायकोर्टात जायला हवे.अस निवृत्त  पोलिस अधिकारी धनराज वंजारी यांनी म्हटले आहे.

----------------------------------------------------

( संपादन  - तुषार सोनवणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT