मुंबई

सचिन वाझेची उत्तरे कोड्यात टाकणारी; कटात आणखीही पोलिस अधिकारी सामील?

सकाळन्यूजनेटवर्क

मनसूख हिरेन हत्याप्रकरणात निलंबित पोलिस आधिकारी सचिन वाझे याला कोर्टानं तीन एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. एनआयए कोर्टानं कोर्टात हजर करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सचिन वाझे यांनी आपल्यावरील आरोपाचं खंडण करत बळीचा बकरा करण्यात येत असल्याचं म्हटलं. गुरुवारी सचिन वाझेला एएनआयनं कोर्टात हजर केलं. त्यापूर्वी सचिन वाझेनं प्रसारमाध्यमांशी सवांद साधला. 

एएनआय कोर्टात सुनावणी होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सचिन वाझे म्हणाला का, 'मला या प्रकरणात बळीचा बकरा केला जातो. या प्रकरणाची मी फक्त दीड दिवस चौकशी केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास मी एकट्यानेच केला नाही. तर गुन्हे शाखा आणि मुंबई पोलिसांनी देखील प्रकरणासाचा तपास केला आहे. तसेच एएनआयसमोर मी कोणत्याही गुन्ह्यांची कबुली दिली नाही. ' 

गुरुवारी दुपारी एएनआयनं सचिन वाझेला कोर्टात हजर केलं. यावेळी कोर्टानं त्याला तीन एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. सचिन वाझे आणि एएनआयच्या वकीलांनी कोर्टात आपला युक्तीवाद सादर केला. यावेळी  एएसजी अनिल सिंह यांनी स्कॉर्पिओमध्ये सापडलेलं धमकीचं पत्रच कोर्टात वाचून दाखवलं. त्यात असं म्हटलेय की, "अगलीबार यह सब सामान कनेक्ट होके आएगा, समझ जा। तुझे औरी तेरी पुरी फैमेली को उडा ने का बंदोबस्त कर दिया है"

तर स्कॉर्पिओमध्ये धमकीची दोन पत्र होती अशी माहिती एनआयए कोर्टात दिली आहे. दुस-या पत्रात अश्लिल भाषेचा वापर असल्यानं सरकारी वकिलांनी ते भर कोर्टात वाचून न दाखवता, थेट न्यायमूर्तींना सोपवलं. विशेष एनआयए न्यायाधीश प्रशांत सित्रे यांच्यापुढे सुनावणी झाली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bangalore Highway Traffic : किणी टोलनाक्यावरील राजू शेट्टींनी काढली रात्र; आंदोलनाचा दुसरा दिवस; मुंबईच्या दिशेने जाणारे दूध आणि भाजीपाला रोखण्यास सुरुवात

Wildlife Protection: दिवाळीत घुबडांच्या शिकारीचा धोका; वन विभागाकडून विशेष पथके तैनात; संशयित ठिकाणी छापे टाकणार

Latest Marathi News Live Update: चिपी ते नवी मुंबई विमानसेवा आता आठवड्यातील सातही दिवस

Sachin Tendulkar on his Captaincy : मला स्वतःच्या मर्जीने संघ निवडायचे पूर्ण स्वातंत्र्य नव्हते! सचिन तेंडुलकरचा धक्कादायक खुलासा; दोन आवडत्या कर्णधारांची नावं सांगितली

Uttarakhand Model School: बालपणीच्या शाळेत पोहोचले मुख्यमंत्री; जुन्या आठवणींना उजाळा, दीड कोटींच्या खर्चातून हायटेक मॉडेल स्कूल

SCROLL FOR NEXT