मुंबई

एक 'किस' तुम्हाला पाडू शकेल आजारी, भयंकर आजारी...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - जगभरात महाभयंकर कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात फैलाव झालाय. एकट्या चीनमध्ये नऊशे पेक्षा जास्त नागरिकांनी या महाभयंकर कोरोनामुळे आपले प्राण गमावलेत. या पार्श्वभूमीवर अनेक देशांकडून खबरदारीच्या उपाय म्हणून उपाययोजना केल्या जातायत. भारत हा चीनचा शेजारी आहे. भारतातील अनेक मुलं ही 'चीन'मध्ये शिकायला जातायत. मोठा व्यापार आपण चीनसोबत करतो अशात भारतात देखील मोठ्या कोरोनापासून वाचण्यासाठी उपाययोजना केल्या गेल्यात.

सध्या Valentine Week सुरु आहे, याचं मोठं आकर्षण तरुणाईला आहे. येत्या १३ तारखेला किस डे साजरा केला जाणार आहे. अशात 'किस डे'ला तुम्हाला मिळणाऱ्या पप्पीपासून जरा सावध राहा. कारण कदाचित यामुळे तुम्हाला कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो.      

कोरोनाचं धक्कादायक वास्तव 

चीनकडून आलेल्या अधिकृत माहितीच्या आधारे कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ९०८ लोकांना आपल्या प्राणांना मुकावं लागलंय. तब्बल ४०,००० पेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली आहे. अनधिकृत माहितीच्या आधारे आजपर्यंत तब्ब्ल २५,०००  नागरिकांनी  कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. कोरोना अजून मोठ्या प्रमाणावर  पसरू नये  म्हणून अनेकांना घराबाहेर पडण्यास  देखील मज्जाव  केला  जातोय.  

किसमुळे कोरोना व्हायरस पसरण्याचा मोठ्या प्रमाणात धोका आहे. याच प्राश्वभूमीवर तैवानमध्ये 'किस-डे'च्या दिवशी 'किस'वर निर्बंध घातलाय. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सिनेमा किंवा सिरियल्समध्ये जर किसिंग सिन असतील तर ते देखील दाखवले जाऊ नयेत असं सांगण्यात आलंय.

मनोरंजन विश्वात काम करताना किंवा सार्वजनिक ठिकाणी काम करताना फिरताना लोकांनी एकमेकांच्या जास्त जवळ येऊन बोलू नये, असं आवाहन करण्यात आलंय.  दरम्यान तैवानमध्ये घेण्यात येत असलेल्या या खबरदारीच्या उपाययोजनांचं नागरिकांकडून स्वागत करण्यात आलं आहे.

taiwan puts ban on kiss day as precautionary measures to avoid spreading corona virus

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत विविध विषयावरील देखावे

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

IndiGo flight technical glitch: कोचीहून अबुधाबीला १८० प्रवाशांसह निघालेल्या इंडिगो विमानात उद्भवला तांत्रिक बिघाड अन् मग...

"नागरिकांच्या जीवाची किंमत आहे का ?" टेस्ला कार घेतल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईकांना अभिनेत्याचा सवाल, "एवढा पैसा कुठून आला ?"

SCROLL FOR NEXT