Uddhav-Thackeray 
मुंबई

"उद्धव ठाकरेंना तुमच्याकडेच ठेवा आणि रोज सलाम ठोकत बसा.."

विराज भागवत

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसते आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाउन लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच यासंबंधी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. लॉकडाउन लागू केला नाही तरी कठोर निर्बंध लादण्यात येतील असं सांगितलं जातंय. लॉकडाउनच्या निर्णयाबद्दल महाविकास आघाडी सरकारमध्ये काही अंशी मतभेद दिसून आले आहेत, पण अखेरचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतली असं सरकारमधील मंत्री म्हणताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे हे दोघेही सध्या कोरोना पॉझिटिव्ह आहेत. असं असतानाही उद्धव ठाकरे हे धैर्याने परिस्थितीला सामोरं जात असून त्यासाठी त्यांना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सलाम केला होते. त्याच वक्तव्यावरून भाजप आमदार नितेश राणे आक्रमक झाले.

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड...

"पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय.टिका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत.. त्यास सलाम! सलाम!! सलाम!!!", असं ट्वीट त्यांनी केलं होतं.

नितेश राणेंचे आक्रमक उत्तर...

"महाराष्ट्राची वाट लावणे.. महाराष्ट्र विकायला काढणे.. कुटुंबापलीकडे न बघणे.. म्हणजे महाराष्ट्र सांभाळणे म्हणतात!!! मग उद्धव ठाकरेना तुमच्याकडेच ठेवा आणि रोज उठून सलाम ठोकत बसा.. आव्हाड साहेब!!!", असा टोमणा नितेश राणेंनी आव्हाडांना मारला.

दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची एक बैठक बोलवली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे राज्यातील कोरोना परिस्थितीचा तसेच व्यापारी वर्गाचा आणि इतर घटकांच्या मतांचा आढावा घेणार असल्याचे बोलले जात आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार किमान काही दिवसांचा कडक लॉकडाउन लावण्यात येईल असं चित्र आहे. मात्र विरोधी पक्ष असलेल्या भाजपने लॉकडाउनचा कडाडून विरोध केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनवरून राजकारण न करण्याचे आवाहन विरोधकांने केले आहे, पण अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी गोरगरिबांच्या खात्यात उदरनिर्वाहासाठी पैसे जमा करा मगच लॉकडाउन करा अशी मागणी सध्या करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Hamas war: हमासने इस्राईलला पाठवलेला एक मृतदेह अनोळखी; शांतता प्रस्तावाला गालबोट लागण्याची शक्यता

FASTag Rules Change : 'फास्टॅग'चे नियम बदलणार! आता ‘या’ वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागणार

Tanya Mittal Case: तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ! फसवणुकीचा गंभीर आरोप अन्...; सोशल मीडिया इन्फ्लुएंसरकडून तक्रार दाखल

Mumbai Metro: मेट्रो ३ प्रवास आता अधिक सोपा! फीडर बस सेवेचा शुभारंभ, दर किती अन् कुणाला फायदा होणार?

Latest Marathi News Live Update : अमळनेर येथे महाविकास आघाडीतर्फे आक्रोश मोर्चा

SCROLL FOR NEXT